जळगाव : शहरातील रस्त्याची समस्या अतिशय गंभीर आहे. त्यासाठी शासनाने ४२ कोटी रुपयांचा निधी दिला आहे. तो निधी मिळविण्यासाठी आपला पाठपुरावा सुरू आहे. त्यातील काही निधी प्राप्तही होत आहे. त्यासोबत आपण रस्त्याच्या कामांचाही पाठपुरावा करीत आहोत. दहा रस्त्यांच्या कामांबाबत आपण अधिकाऱ्यांना जाब विचारला असल्याची माहिती आमदार सुरेश भोळे यांनी दिली.
जळगाव शहर विधानसभा क्षेत्र असल्याने शहरातील विकासाकडे आपण लक्ष देत आहोत, असे मत व्यक्त करून आमदार सुरेश भोळे म्हणाले, की शहरातील समस्यांबाबत आपण महापालिकेत जाऊन अधिकाऱ्यांच्या बैठका घेतो. त्यांच्याकडून विकासाबाबत माहिती घेतो. याशिवाय शासनाकडून उपलब्ध होत असलेल्या निधीचीही आपण माहिती घेत असतो.(MLA Suresh Bhole Will pursue funding for roads10 Question to authorities regarding road work Jalgaon News)
शहराचा विकास हेच ध्येय
शहरात विविध समस्या असल्याचे मत व्यक्त करून आमदार भोळे म्हणाले, की शहराचा विकास हेच आपले एकमेव लक्ष्य आहे. त्यासाठी आपण २५:१५ चा निधी, अल्पसंख्याक निधी, तसेच विशेष निधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. शहरातील रस्त्यांसाठी ४२ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तो निधी उपलब्ध करण्यासाठी आपला सतत पाठपुरावा सुरू आहे. त्यामुळे अगोदर पाच कोटी आणि आता आठ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. पुढचा निधीही लवकरच प्राप्त करण्यासाठी आपला प्रयत्न राहणार आहे.
निधी कमी नाही, कामे होण्याची गरज
शहराच्या विकासासाठी आपण कोणताही निधी शासनाकडून कमी पडू देणार नाही. शहरात विकासकामे वेगाने होण्याची गरज आहे. महापालिकेतील अधिकाऱ्यांनी त्याबाबत गतीने काम करण्याची गरज आहे, तसेच सत्ताधारी पदाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज असल्याचे मत आमदार भोळे यांनी व्यक्त केले.
रस्ते कामांसाठी पाठपुरावा
रस्त्यांसाठी निधी उपलब्ध करण्यासोबतच आपण रस्ते कामासाठी पाठपुरावा करीत असल्याचे सांगून आमदार भोळे म्हणाले, की शहरातील रस्ते कामांसाठी आता आमदार चंदूभाई पटेल यांच्या निधीतूनही पाच कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. यात शिवाजीनगर भागातील लाकडी वखारीचे रस्ते तसेच शहरातील काही रस्त्यांची कामे करण्यात येणार आहेत. याशिवाय ४२ कोटी रुपयांतून शहरातील दहा रस्त्यांच्या कामाबाबतही आपण पाठपुरावा करीत आहोत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांना आपण रस्त्यांची कामे गतीने करण्याबाबत सांगितले. त्याबाबत त्यांनीही ही कामे गतीने होण्याची ग्वाही दिली. यानंतरही या रस्त्याचे कामे वेगाने झाली नाही, तर आपण संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची शिफारस शासनाकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.