Jalgaon : मोबाईल लांबवणारी परप्रांतीय टोळी सक्रिय

जिल्हापेठ पोलिसांनी तत्काळ हालचाली करून बसस्थानक परिसरातून एकाला अटक केली.
mobile theft
mobile theftesakal
Updated on

जळगाव : शहरातील नवीन बसस्थानकात प्रवाशाच्या खिशातून मोबाईल लांबविल्याची घटना घडली होती. जिल्हापेठ पोलिसांनी तत्काळ हालचाली करून बसस्थानक परिसरातून एकाला अटक केली. सूरज कुमार राम (वय १९, रा. मयाटोला, ता. महाराजपूर, झारखंड) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

कल्याण येथील रहिवासी अनिल चौधरी (वय ५३, रा. वृंदावन कॉम्प्लेक्स, राजूनगर, डोंबिवली, वेस्ट कल्याण) रेल्वेत नोकरीला आहेत. मंगळवारी (ता. २१) त्यांच्या खासगी कामासाठी आले असल्याने ते शालक सुनील गोविंदा ढाके (रा. कोल्हेनगर, जळगाव) यांच्याकडे मुक्कामाला थांबले होते. दुसऱ्या दिवशी बुधवारी (ता. २२) भुसावळ जाण्यासाठी अनिल चौधरी सकाळी ९ वाजता जळगाव नवीन बसस्थानकात आले. भुसावळ बसमध्ये चढत असताना अनोळखी तरुणाने त्यांना धक्का देत शर्टाच्या खिशातील मोबाईल हिसकावत पळ काढला. अनिल चौधरी यांनी आरडाओरड केल्यावर असता मोबाईल हिसकावणारा चोरटा पळून जाण्यात यशस्वी ठरला. चौधरी यांनी जिल्‍हापेठ पोलिसांत धाव घेत तक्रार दिल्यावरून गुन्ह्याची नोंद करण्यात आली. गुन्हा दाखल होताच जिल्‍हापेठ पोलिसांनी संशयिताचा शोध सुरु केला.

mobile theft
Jalgaon : भाजीपाला घेताना मंगळसूत्र लंपास

आठ गुन्ह्याची कबुली

जिल्हापेठ पोलिस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकातील उपनिरीक्षक गणेश देशमुख, जुबेर तडवी, अमित मराठे यांच्या पथकाने संशयित सुरजकुमार राम (वय १९, रा. मयाटोला, ता. महाराजपूर, झारखंड) याला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने चोरीचे ८ मोबाईल काढून दिले. त्याच्या साथीदारांचा शेाध सुरु आहे

mobile theft
क्षुल्लक कारणावरून पत्नीचा खून

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.