जळगाव : ‘ओमिक्रॉन’च्या पार्श्वभूमीवर जिल्हा आरोग्य यंत्रेणेने सज्ज राहण्यासाठी तयारी सुरू केली आहे. शुक्रवारी (ता. ३१) जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनी मोहाडी येथील ८०० खाटांचे रुग्णालय, इकरा रुग्णालयास भेट देत तेथील खाटांचा, ऑक्सिजन सिलिंडर, ओटू बेड सज्ज ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मोहाडी रुग्णालयात अगोदर ऑक्सिजनयुक्त केवळ शंभर बेड होते. आता आणखी चारशे ओटू बेड तयार करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. त्याचे काम शनिवार (ता. १)पासूनच सुरू होणार आहे. दरम्यान जिल्ह्यात तिसऱ्या लाटेसाठी एकूण १७ हजार ४६१ बेड सज्ज असल्याचे सांगण्यात आले.(Mohadi Hospital equipped with 400 oxygen beds)
कोरेानाची दुसरी लाट ओसरल्यानंतर मोहाडी येथील महिला रुग्णालय कोरोना रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आले होते. रुग्ण नसल्याने खाटाही आवरून ठेवण्यात आल्या होत्या. असे असताना तिसऱ्या लाटेच्या शक्यतेने आता पुन्हा खाटा तयार करून ऑक्सिजनयुक्त पाईपलाईन योग्य स्थितीत आहे, किंवा नाही, बेड योग्य आहेत का? इतर सुविधा आहेत किंवा नाही याचा आढावा डॉ. चव्हाण यांनी घेतला. शंभर आयसीयू बेड मोहाडी रुग्णालयात सज्ज ठेवण्यात आले आहे. सोबतच इतर सातशे बेडही सर्वसाधारण लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी तयार करण्याच्या सूचना दिल्या. ऑक्सिजन, ड्यूरा सिलिंडर, जेम्बो सिलिंडर ऑक्सिजनने भरलेली आहेत अथवा नाही त्याची तपासणी करून ते भरून सज्ज ठेवण्याचे आदेश देण्यात आले. मोहाडी रुग्णालयात नव्याने ४०० ओटू बेड तयार करण्याचे आदेश आहेत. त्यासाठी ओटू पाइपलाइन तयार करण्याच्या सूचना संबंधित कंत्राटदाराला देऊन लागलीच काम सुरू करण्याचे आदेश देण्यात आले.(jalgaon news)
शिरसोली रोडवरील इकरा मेडीकल कॉलेज व रुग्णालयासही डॉ. चव्हाण यांनी भेट देऊन ऑक्सिजन बेड तयारीचा आढावा घेतला.
जिल्ह्यात अशी आहे सज्जता ओमिक्रॉन रुग्ण
एकूण बेड १७ हजार ४६१
ऑक्सिजन बेड ५ हजार
व्हेंटिलेटर ५६०
आयसीयू बेड १२००
नॉर्मल बेड १२ हजार
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.