Money Fraud : ऊसतोड कामगारांकडून ठेकेदाराला गंडा; 11 संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल

Money
Money
Updated on

जळगाव : शिरसोली येथील अकरा ऊसतोड मजुरांनी ठेकेदाराकडून प्रत्येकी ३० हजार रुपये घेऊन कामासाठी जाण्यास नकार दिला. त्यांच्याकडे मजुरीचे पैसे परत मागितले असता त्यांच्याकडून ठेकेदाराला जीवेठार मारण्याची धमकी देण्यात आली. याप्रकरणी ऊसतोड मजूर मुकादम याच्यासह ११ जणांविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Money
Jalgaon News : मुलाच्या मामामुळे फसला सैराट गेम; अल्पवयीन मुलीसह तरुण पोलिसांच्या ताब्यात

तळेगाव कृष्णनगर तांडा (ता. चाळीसगाव) येथे जगदिश किसन खरात (३७) राहतात. ते ताराचंद हरीभाऊ हिवाळे, प्रवीण किसन खरात, अनिल लक्ष्मण चव्हाण, संजय गोपीनाथ जाधव यांच्यासोबत भागीदारीने साखर कारखान्यांना ऊसतोडीसाठी मजूर पुरवित असतो. कर्नाटक राज्यातील परसलगी सहकारी साखर कारखाना, जमखंडी याला ऊस तोडणीसाठी मजूर पाहिजे असल्याने जगदिश खरात यांनी त्यांचे भागीदार अर्जुन जाधव (रा. रायपुर कंडारी) यांच्याकडे विचारणा केली. त्यावर होकार दिला असता प्रती मजूर ३० हजार रुपये आणि प्रत्येक मजूरामागे ५ हजार रुपये कमिशन प्रमाणे त्यांचा व्यवहार झाला.

हेही वाचा : गरज आहे पंढरपूर पुन्हा समतेचे पीठ होण्याची....

व्यवहार झाल्याप्रमाणे खरात हे मजूर कारखान्यावर घेऊन जाण्यासाठी (ता.१३) अबुजर ड्रायव्हर हा (एमएच ४३ बी २४०४) क्रमांकाचा आयशर घेवून शिरसोली येथे पोहचला. याठिकाणी अर्जुन जाधव याने सर्व मजूरांची ओळख करुन देत हे मजूर तुमच्यासोबत ऊस तोडणीसाठी येणार असल्याचे सांगितले. त्यानुसार खरात यांनी मजुरांना ठरल्याप्रमाणे प्रत्येकी ३० हजार रुपये आणि कमीशन म्हणून ३३ हजार रुपये दिले.

Money
Raj Kundra Made Adult Films: राज कुंद्रा फसणार!, मुंबई पोलिसांच्या 450 पानी चार्जशीटमधून मोठे आरोप

मजुरांचा पैसे घेऊन नकार

मजुरांना पैसे दिल्यानंतर त्यांना खरात यांनी चालण्यास सांगितले असता, त्यांनी तयारी करतो आणि सोबत येतो असे सांगितले. बराच वेळ होऊनही एकही मजूर येत नसल्याने ठेकेदाराने पुन्हा त्यांना चालण्यास विनंती केली. मात्र मजुरांनी येण्यास टाळाटाळ करीत जिवेठार मारण्याची धमकी दिली. ठेकेदार जगदीश खरात यांच्या तक्रारीवरुन मुकादम अर्जुन भिमा जाधव (रा. रायपुर कंडारी) यांच्यासह अशोक रायसिंग भिल, रोहिदास शिवाजी भिल, गोकुळ शिवाजी भिल, शिवाजी भाटू भिल, राहुल अशोक भिल, सुनील महारु भिल, करण उत्तम जाधव, सुकदेव सुनील मालचे, राजू मानसिंग भिल, राजेंद्र विठ्ठल मोरे, अनिल सुकलाल भिल (सर्व रा. शिरसोली) यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()