Jalgaon Monsoon: दिवसभराच्या उघडिपीनंतर सायंकाळी धुवाधार! सुटीचा दिवस असल्याने कुटुंबीयांसह पार्टी

monsoon
monsoonesakal
Updated on

Jalgaon Monsoon : शहरासह जिल्ह्यात आज दिवसभर पावसाने विश्रांती घेतली. यामुळे शेतात मशागत, निंदणीसाठी शेतकऱ्यांसह शेतमजूर सरसावले होते. दोन ते तीन दिवसांपासून शहरासह जिल्ह्यात सतत पाऊस सुरू आहे.

दरम्यान, सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास अचानक धुवाधार पावसाला सुरवात झाली. तब्बल साडेसहापर्यंत पाऊस सुरू होता. त्याने शहरातील अनेक रस्त्यांवर पाणी साचले होते. विजांच्या कडकडाटासह पावसाची रिपरिप रात्री उशिरापर्यंत सुरू होती. (monsoon uodate tourism people Jalgaon)

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

monsoon
Monsoon Tourism: रिमझिम सरीत बहरली वर्षासहल! वीकएंडमुळे तोबा गर्दी

रविवारी (ता. २३) सकाळपासूनच पावसाने विश्रांती घेतली. सूर्यप्रकाशही पडल्याने शेतात साचलेले पाणी वाहून जाण्यास उसंत मिळाली. रविवारी शेतकरी शेतात साचलेले पाणी काढणे, शेतातील तण काढणे, निंदणी करताना दिसत होते.

सततच्या पावसामुळे घरात बसून कंटाळलेल्या नागरिकांना पावसाच्या उघडिपीने मोकळीक मिळाली. काहींनी कुटुंबीयांसह, तर काहींनी मित्रांसोबत वाघूर (ता. जळगाव), हतनूर (ता. भुसावळ) धरणांवर नैसर्गिक सौंदर्य पाहण्यासाठी गर्दी केली होती.

काहींनी धरणावर जाऊन भोजनाचा आस्वाद घेतला. काही तरुणांनी पार्टी केली. अनेकांनी शहरातील मेहरुण तलावात झालेला साठा व सौंदर्य पाहण्यासाठी गर्दी केली होती.

monsoon
Monsoon session: रोहित पवारांचं पावसात एकला चलो रे! विधानभवनातील छत्रपतींच्या पुतळ्याजवळ एकटेच बसले आंदोलनाला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.