जळगाव : जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे आरती विकास गवळी या बाळंतीणचा २२ डिसेंबरला मृत्यू झाला असा आरोप करत समतानगरवासियांनी ठिय्या आंदोलन केले होते.
नवजात बाळाला सोडून आई निघून गेली, त्याच बाळाचे आज जाऊळ काढणीचा कार्यक्रम होता. तेथून पिता विकास याने मला थोडे काम आहे, जाऊन येतो असे कुटुंबीयांना सांगत काढता पाय घेतला. घरी येत गळफास घेत आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना आज दुपारी घडली. (Mother died in childbirth father hanged in home due to sadness of wife Death Jalgaon News )
नातेवाइकांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, विकास गवळी हा आपल्या परिवारासह वास्तव्याला होता. हातमजुरीचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. मंगळवारी (ता. ३१) दुपारी त्यांच्या मुलाच्या जाऊळाचा कार्यक्रम होता.
कार्यक्रमात विकास गवळीने, घरच्यांना मला थोडं काम असल्याचे सांगून ते थेट समता नगरातील राहत्या घरी परतला. त्याने राहत्या घरातच दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्याचे कारण समजू शकले नाही.
हेही वाचा : T+1 Settlement मुळे वाढेल शेअर बाजारातली उलाढाल
दुपारी तीनला विकासचे आईवडील घरी आल्यानंतर त्यांना हा लक्षात आला. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात डॉक्टरांच्या तपासणीनंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. रामानंदनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
चिमुरड्याचे मातृ-पितृ छत्र हरपले
नवजात बाळ सोडून बाळंतीण आई आरती गवळी यांचा २२ डिसेंबरला मृत्यू ओढवला. तर, पिता विकास गवळी याला पत्नीचा विरह आणि आई विना मुलाची अवस्था पाहवत नसल्याच्या क्लेशदायक वेदनेतून विकासने पत्नी आरतीचा फोटो बघता-बघताच गळफास घेत आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.