Jalgaon Crime News : जळके (ता. जळगाव) येथून नाचणखेडा जात असताना पळासखेडा गावाजवळ डंपरने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार कमलाकर पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आला.
याप्रकरणी पोलिसांत अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
जळके-विटनेर येथील किराणा दुकानदार कमलाकर मोतीराम पाटील (वय ६४) हे नाचणखेडा येथे राहतात. नातेवाइकांकडे दशक्रिया विधीसाठी कमलाकर पाटील हे दुचाकीने (क्र. एमएच १९, डीएन ७९१४) निघाले.
पळासखेडा (मिराचे) गावानजीक शाळेजवळ समोरून येणाऱ्या विना क्रमांकाच्या डंपरने त्यांच्या दुचाकीला धडक देत फरफटत नेले. यात कमलाकर पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर चालक डंपर सोडून पसार झाला.
अपघाताची माहिती पोलिसांना आणि मयताच्या नातेवाइकांना कळवण्यात येऊन तसेच खासगी वाहनाने मृतदेह जळगाव जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला. मात्र उपचारा पूर्वीच कमलाकर यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय तपासणीनंतर सांगण्यात आले होता.
यावेळी कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. पोलिस पंचनामानंतर मृतदेहाचे विच्छेदन करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, दोन मुली, जावई असा परिवार आहे.
चालक पसार.. डंपरही गायब
अपघातानंतर ग्रामस्थांनी धाव घेतल्यावर गर्दी एकवटल्याचे पाहून चालकाने वाळूने भरलेलं डंपर सोडून पळ काढला. पळासखेडा पोलिस पाटील प्रकाश बिचारे यांनी त्या डंपरची चावी काढून घेत ताब्यात घेवुन ते घरी निघून गेले.
थोड्या वेळाने डंपर मधील वाळू खाली करून नंतर अपघाताला कारणीभूत डंपरही जागेवरून नाहीसा झाला. घडल्या प्रकारामुळे पळासखेडा ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत, पुन्हा गावातून कुठलीच वाळू वाहने जाऊच द्यायची नाही, अशा चर्चेला उधाण आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.