Jalgaon News : रस्त्यांचे काम अन ‘ट्रॅफिक जाम’; वाहतुकीच्या कोंडीने वाहनधारक त्रस्त

अत्यंत वर्दळीच्या मार्गांवरील कामांमुळे वाहतूक एका बाजूने वळविल्याने दिवसभरात अनेकदा वाहतुकीची कोंडी होत असून वाहनधारक त्रस्त झाले आहेत.
Due to the ongoing road work, the traffic jam is due to one-way traffic.
Due to the ongoing road work, the traffic jam is due to one-way traffic.esakal
Updated on

Jalgaon News : शहरातील प्रमुख रस्त्यांच्या कॉंक्रिटीकरणाचे काम वेगात सुरु आहे. मात्र, या अत्यंत वर्दळीच्या मार्गांवरील कामांमुळे वाहतूक एका बाजूने वळविल्याने दिवसभरात अनेकदा वाहतुकीची कोंडी होत असून वाहनधारक त्रस्त झाले आहेत.

त्यामुळे पर्यायी मार्ग म्हणून अन्य उपरस्त्यांवर गर्दी वाढू लागली आहे. (Motorists suffer from traffic jams jalgaon news)

जळगाव शहरात कधी नव्हे एवढी विविध रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली आहेत. सध्या ८५ कोटींच्या निधीतून प्रमुख रस्त्यांच्या कॉंक्रिटीकरणाचे काम वेगाने सुरु आहे. त्यात काव्यरत्नावली चौक ते आकाशवाणी चौक- स्वातंत्र्य चौक- बसस्थानक- शिवतीर्थ- नेहरुचौक व पुढे टॉवर चौकापर्यंतच्या मुख्य रस्त्याचे काम होणार आहे.

मुख्य रस्त्यावर कोंडी

त्यातील काव्यरत्नावली चौक ते आकाशवाणी चौक या पहिल्या टप्प्याचे काम सुरु असून वर्दळीच्या स्वातंत्र्यचौक ते बसस्थानकापर्यंतच्या रस्त्याचे कॉंक्रिटीकरणही हाती घेण्यात आले आहे. त्यामुळे एका बाजूने रस्त्याचे काम सुरु असताना वाहतूक दुसऱ्या बाजूने वळविण्यात आली आहे.

हे दोन्ही टप्प्यातील रस्ते वर्दळीचे आहेत. त्यामुळे या एकतर्फी मार्गावरील वाहतुकीने प्रचंड कोंडी होत आहे. विशेष म्हणजे, आकाशवाणी चौक ते बसस्थानक या मार्गावर एसटी बसचीही ये जा मोठ्या प्रमाणावर होत असते, त्यामळे स्वातंत्र्य चौकापासून थेट बस स्थानकापर्यंत वाहनांची कोंडी होत असल्याने वाहनधारक त्रस्त आहेत.

अजिंठा चौकाकडील रस्ता

अशाच प्रकारे अजिंठा चौक ते चित्राचौकापर्यंतच्या रस्त्याचे कॉंक्रिटीकरण होत आहे. यात अजिंठा चौक ते स्मशानभूमीपर्यंतचा टप्पा सुरु असून त्याठिकाणीही एका बाजूने वाहतूक वळविण्यात आल्याने या मार्गावरही वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे.

Due to the ongoing road work, the traffic jam is due to one-way traffic.
Jalgaon News : कर्जमाफीच्या संदेशापासून ग्राहकांनी सावध राहावे; ‘RBI’चे नागरिकांना आवाहन

कारण, याच मार्गावरुन औद्योगिक वसाहतीकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या मोठ आहे. शिवाय अजिंठा चौकाच्या पुढेही थेट कुसुंब्यापर्यंत नागरी वस्ती वाढल्याने नागरिकांची मोठी वाहतूक या मार्गावरुन होत असते. त्यामुळे कोंडी अधिकच वाढत आहे.

वाहतूक पोलिस गायब

या दोन्ही प्रमुख मार्गांवर कॉंक्रिटीकरण होत असूनही वाहतुकीच्या नियमनासाठी वाहतूक पोलिसांची व्यवस्था याठिकाणी करण्यात आलेली नाही. ‘सकाळ’ने गेल्या महिन्यात याबाबत वृत्त दिल्यानंतर स्मशानभूमीजवळील चौकात काही दिवसांसाठी पोलिस नियुक्त करण्यात आले.

मात्र, नंतर ते गायब झाले. सध्या स्वातंत्र्य चौकात हीच स्थिती आहे. रस्त्यांच्या कामाला कुणाचाही विरोध नाही. मात्र, वाहतूक नियमनासाठी पोलिसांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

Due to the ongoing road work, the traffic jam is due to one-way traffic.
Jalgoan News : साखर, तुरडाळीचे भाव कडाडले; सणासुदीत महागाईचा भडका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.