Jalgaon NMU News : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे इनोव्हेशन, इनक्युबेशन व लिंकेजेस केंद्र आणि नंदुरबार येथील डॉ. हेडगेवार सेवा समितीचे कृषी विज्ञान केंद्र यांच्यात कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांच्या उपस्थितीत सामजंस्य करार करण्यात आला. (MoU in nmu Krishi Science Centre jalgaon kbcnmu news)
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सप्ताहांतर्गत हा सामजंस्य करार करण्यात आला. नंदुरबार येथील कृषी विज्ञान केंद्राचे कृषी व संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय काम आहे, तर विद्यापीठातील केसीआयआयएल केंद्रातर्फे नवउद्योजक घडविण्याचे काम केले जात आहे.
कृषिक्षेत्रात उद्योजक संस्कृती
या सामजंस्य करारामुळे कृषी क्षेत्रात नवीन उद्योजक संस्कृती रूजविण्यावर भर देण्यात आला आहे. त्याप्रमाणे नवनवीन तंत्रज्ञान, ज्ञान आणि नवोपक्रमावर आधारित स्टार्टॲपला प्रोत्साहन दिले जाणार आहे. इतर संस्था अथवा उद्योजकांनी नावीन्यपूर्ण विकसित केलेल्या तंत्रज्ञानाचा व्यावसायिकतेसाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाईल. शैक्षणिक संस्था, वित्तीय संस्था, उद्योग आणि इतर संस्था यांच्यात स्टार्टॲपसाठी नेटवर्क स्थापन करून दिले जाणार आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
यासोबतच विद्यार्थ्यांचे संवाद कौशल्य आणि व्यक्तिमत्त्व विकसित करणे, आत्मविश्वास वाढविणे, उद्योजकतेसाठी आवश्यक असलेले नेतृत्व निर्माण करणे, या प्रकारचे उद्देश या सामजंस्य करारामध्ये नमूद केले आहेत.
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला अभिप्रेत असलेली इंटर्नशिपही विद्यार्थ्यांना या सामजंस्य करारामुळे उपलब्ध होणार आहे. या कराराप्रसंगी केसीआयआयएलचे संचालक डॉ. राजेश जवळेकर, डॉ. भूषण चौधरी, कृषी विज्ञान केंद्राचे ट्रस्टी व अधिसभा सदस्य केदारनाथ कवडीवाले, विषयतज्ज्ञ व अधिसभा सदस्य जयंत उत्तरवार आणि कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ वैज्ञानिक व प्रमुख राजेंद्र दहातोंडे उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.