Jalgaon Crime News : चाळीसगावातील एकावर MPDA चा बडगा

Crime News
Crime Newsesakal
Updated on

जळगाव : पोलिस दलाच्या प्रतिबंधात्मक कारवाई मिशनमध्ये चाळीसगावातील आणखी एक गुन्हेगार जाळ्यात अडकला आहे.

निखिल ऊर्फ भोला सुनील अजबे (वय२ १) याच्यावर हद्दपारीची कारवाई केली असताना, त्याने गुन्ह्यांची सरबत्ती सुरूच ठेवल्याने अखेर त्याला पोलिसांनी एमपीडीए कायद्यांतर्गत स्थानबद्ध केले आहे. (MPDA Action on one Criminal in Chalisgaon Most criminals underground Jalgaon News)

Crime News
Market Committee News : बाजार समित्यांमध्ये आता शेतकऱ्यांना उभे राहाता येणार

गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी जिल्‍हा पोलिस दलाने मिशन प्रिव्हेन्शन अंतर्गत दोन दिवसांपूर्वीच चाळीसगावच्या ११ अट्टल गुन्हेगारांना मोक्का अंतर्गत गजाआड केले होते. या कारवाईला आठवडा उलटत नाही, तोवर पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, अपर अधीक्षक रमेश चोपडे, सहाय्यक अधीक्षक अभयसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किशन नजनपाटील, के. के. पाटील यांच्या पथकातील सुनील दामोदरे, विनोद भोई, तुकाराम चव्हाण यांनी ठोस पुराव्यानिशी महाराष्ट्र झोपडपट्टीदादा विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबतचा सुधारित अधिनियम-१९९६, २००९ व २०१५ चे कलम ३ (१) अंतर्गत जिल्‍हाधिकारी अमन मित्तल यांना सादर केलेल्या स्थानबद्धतेच्या आदेशावर मंगळवारी (ता. ३१) शिक्कामोर्तब झाले. सहाय्यक निरीक्षक सागर ढिकले, अमित बाविस्कर, अमोल भोसले, रवींद्र वच्छे यांनी निखिल ऊर्फ भोला सुनील अजबे याची अमरावती मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली.

हेही वाचा : T+1 Settlement मुळे वाढेल शेअर बाजारातली उलाढाल

Crime News
Nashik NMC News : सवलत शुल्क न भरल्याने बांधकामे स्थगितीच्या सूचना

हद्दपारीत गुन्हेगारी

निखिल अजबे (रा. नारायणवाडी, चाळीसगाव) याच्याविरुद्ध प्राणघातक हल्ले, जबरी लूट, शरीराविरुद्ध दुखापत यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याला जुलै २०२२ मध्ये दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार केले होते. हद्दपार आदेशाचे उल्लंघन करून तो सर्रास गुन्हेगारीत सक्रिय होता. जामिनावर सुटताच गुन्ह्यांचा कित्ता सुरूच असल्याने चाळीसगावकरांसह पोलिसही त्याला कंटाळले होते.

चाळीसगाव खाली-खाली

चाळीसगाव तालुक्यातील ११ गुन्हेगारांच्या टोळीला मोक्कांतर्गत कारागृहात डांबल्यानंतर हद्दपारीसह स्थाबद्धतेचा धडाका सुरूच असल्याने तालुक्यातील गुन्हेगारांनी कानाला खडा लावला आहे. बहुतांश अंडरग्राऊंड झाले असून, काहींनी गावच सोडून दिल्याची माहिती समोर आली आहे.

Crime News
Nashik News: आयुक्त म्हणतात, भिऊ नका मी तुमच्या पाठीशी! विभागप्रमुखांना वसुलीचे उद्दिष्ट गाठण्याच्या सूचना

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.