Jalgaon MPDA News : जिल्ह्यातील दोघांवर MPDA चा बडगा; प्रशासन आक्रमक

Illegal sand transportation news
Illegal sand transportation newsesakal
Updated on

Jalgaon News : जिल्ह्यातील अवैध धंद्यासह अवैध वाळू वाहतुकीचा विषय गंभीर होत असून, प्रशासनाने त्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. या अंतर्गत जिल्ह्यात गावठी हातभट्टीच्या दारूचा व्यवसाय करणाऱ्यासह वाळूमाफियाविरुद्ध ‘एमपीडीए’ अंतर्गत स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली.

महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, हातभट्टीवाले, औषधीद्रव्यविषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, तसेच अवैध धंदा, वाळू वाहतूक करणाऱ्या माफियांविरोधात या कायद्यांतर्गत कारवाई करण्याची तरतूद आहे.(MPDA on two in district Administration aggressive Illegal liquor sale action against sand businessman Jalgaon News)

हातभट्टीवाला रडारवर

कायद्यातील या तरतुदीचा वापर करत प्रशासनाने जळगाव तालुक्यातील दापोरा येथील रहिवासी जिभाऊ वसंत गायकवाड (वय ३४) याला अमरावती कारागृहात एका वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश काढण्यात आले. त्याच्यावर हातभट्टीची दारूनिर्मिती व विक्रीचे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

वाळूमाफियावर कारवाई

दुसऱ्या प्रकरणात यावल, चोपडा व जळगाव तालुक्यातील तापी नदीपात्रातून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या कोळन्हावी (ता. यावल) येथील ज्ञानेश्‍वर नामदेव तायडे ऊर्फ नाना कोळी (वय ३२) याच्याविरोधात कारवाई करण्यात आली.

त्यास नागपूर येथील कारागृहात वर्षभरासाठी स्थानबद्ध करण्यात आले. अवैध वाळू उपसा व शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न, अशा स्वरूपाचे गंभीर गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे यांनी हे आदेश गुरुवारी (ता. २२) जारी केले.

मुख्यमंत्र्यांचा दौरा अन्‌ कारवाई

‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमांतर्गत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री मंगळवारी (ता. २७) जळगावला येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमास ३५ हजारांवर लाभार्थी उपस्थित राहतील. या दौऱ्याच्या पाश्‍र्वभूमीवर ही कारवाई झाल्याने आणखी काही जणांवर अशाप्रकारची कारवाई होऊ शकते, असे बोलले जात आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Illegal sand transportation news
Nashik Crime News : नाशिक हादरले! नाशिकरोड रेल्वेस्थानकावर विवाहित तरुणीवर अत्याचार

गुन्हेगारीवर ‘कलेक्टर-एसपींची युती’

पोलिस अधीक्षक एम. राजकुमार आणि जिल्‍हा दंडाधिकारी तथा जिल्‍हाधिकारी अमन मित्तल जिल्‍ह्यातील वाढती गुन्हेगारी आणि अट्टल गुन्हेगारांवर नियंत्रण मिळविण्यासाठी सरसावले असून, जिल्‍ह्यातील ३५ पोलिस ठाण्यांतर्गत अट्टल गुन्हेगारांच्या कुंडल्या धुंडाळण्यात येत आहेत. स्थानिक गुन्हे शाखेने एमपीडीए आणि हद्दपारीचा स्वतंत्र विभागच कार्यान्वित केला आहे.

फैजपूरचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नीलेश वाघ, उपनिरीक्षक मोहन लोखंडे, राजेश बऱ्हाटे, योगेश महाजन, तर तालुका पोलिस ठाण्याचे प्रभारी डीवायएसपी आप्पासाहेब पवार, निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या पथकातील गुन्हे शाखेच्या विशेष पथकातील सुनील दामोदरे, युनूस शेख, ईश्वर पाटील, जयंत चौधरी यांनी अचूक प्रस्ताव तयार करून पुढील कारवाई केली.

सात महिन्यांत १९ गजाआड

जळगाव जिल्ह्यात एमपीडीए कायद्यांतर्गत नोव्हेंबर २०२२ पासून आजपर्यंत गंभीर गुन्हे दाखल असलेले एकूण १९ गुन्हेगारांवर धोकादायक व्यक्ती, हातभट्टीवाले व वाळू तस्कर या नियमाखाली नागपूर, अमरावती, ठाणे, नाशिक, येरवडा मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्याची कारवाई जिल्हा दंडाधिकारी अमन मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली झाली आहे.

Illegal sand transportation news
Nashik Accident News: बस अन् आरएमसी मिक्सर ट्रकचा अपघात; ट्रक चालक जागीच ठार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.