Mukhyamantri Solar Krushi Yojana : 334 एकर जागा जिल्हाधिकारी देणार : वीज कंपनीचे मुख्य अभियंता हुमणे

solar-krushi-pump-yojana.jpg
solar-krushi-pump-yojana.jpgesakal
Updated on

Jalgaon News : राज्यात कृषी अंतर्गत ४५ लाख ग्राहक आहेत. जळगाव जिल्ह्यात १ लाख ६४ हजार ग्राहक कृषी ग्राहक आहेत.

सध्या राज्यात १ लाख शेतकरी ग्राहकांना दिवसा वीज मिळते. उर्वरित ४४ लाख ग्राहकांना मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना-२.०’ या अंतर्गत दिवसा वीज मिळेल. (Mukhyamantri Solar Krushi Yojana Chief Engineer of Mahavitaran informed that 334 acres of land will be given by Collector Aman Mittal jalgaon news)

या प्रकल्पासाठी जळगाव जिल्ह्यात ७९० एकर जागेची गरज आहे. त्यापैकी ३३४ एकर जागा जिल्हाधिकारी अमन मित्तल देणार असल्याची माहिती महावितरणचे मुख्य अभियंता कैलास हुमणे यांनी शनिवारी (ता. २७) येथे दिली.

भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सहमुख्य प्रवक्ते, महावितरणचे स्वतंत्र संचालक विश्वास पाठक यांनी शनिवारी ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना-२.०’ योजनेबाबत माहिती दिली. त्यावेळी जिल्ह्याची माहिती श्री. हुमणे यांनी दिली.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

solar-krushi-pump-yojana.jpg
Unseasonal Rain Crop Damage : वादळी पावसामुळे जिल्ह्यातील 312 हेक्टर क्षेत्राचे नुकसान

या प्रकल्पासाठी १६०० एकर जमीन देऊ केली आहे. जिल्ह्यात ७९० एकर जागा अपेक्षित आहे. त्यापैकी ३३४ जागा जिल्हाधिकारी शासकीय कोट्यातून देतील. त्याबाबत नुकतीच जिल्हाधिकाऱ्यांची मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक झाली. तीत ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना-२.०’ यासाठी जागा देण्याचे काम मिशन मोडवर करण्याचे सांगण्यात आले आहे.

त्यामुळे शासकीय अधिक खासगी जागाही संपादित करण्यात येणार आहे. खासगी जागांना एकरसाठी दीड लाखाचा मोबदला दिला जाणार आहे. जिल्ह्यात १ लाख ६४ हजार, तर खानदेशात ३ लाख २३ हजार कृषिपंप ग्राहक आहेत. जळगाव झोनमध्ये कृषिपंपांची साडेचार हजार कोटी रुपयांची थकबाकी आहे.

solar-krushi-pump-yojana.jpg
Jalgoan Agriculture News : बियाणे, खतांबाबत अडचणी सोडविण्यासाठी नियंत्रण कक्ष; येथे करा तक्रार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.