Jalgaon Agriculture News : चाळीसगावात मुगाला विक्रमी भाव; बाजार समितीमध्ये उच्चांकी दर

Praveen Patil, a progressive farmer of Malshewge, former director Jitendra Vani, during the auction of mung beans in the market committee.
Praveen Patil, a progressive farmer of Malshewge, former director Jitendra Vani, during the auction of mung beans in the market committee. esakal
Updated on

Jalgaon Agriculture News : येथील बाजार समितीमध्ये प्रगतिशील शेतकरी व कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक प्रवीण पाटील (माळशेवगे) यांनी चालू हंगामातील विक्रीसाठी आणलेल्या मुगाला प्रतिक्विंटल ८ हजार ६५१ रूपये विक्रमी भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सचिव जगदीश लोधे यांनी 'सकाळ'ला दिली. (Mung fetched record price in chalisgaon jalgaon Agriculture News)

प्रगतिशील शेतकरी पाटील यांचा मूग हा शेतीमाल मे. शांताराम दामोदर अॅन्ड कंपनी या आडत व्यापाऱ्याकडे सर्वांत उच्चांकी ८ हजार ६५१ रूपये दराने लिलावामध्ये विक्री झाला.

त्यानंतर मे. सुरेश ट्रेडिंग कंपनी या आडत व्यापाऱ्याकडे शेतकरी धनराज हरी चव्हाण (वलठाण) यांचा मूग हा ८ हजार १८१ प्रतिक्विंटल दराने विक्री झाला.

येथील बाजार समिती ही उत्तर महाराष्ट्रात एक अग्रगण्य अशी नावाजलेली बाजार समिती असून, तीन जिल्ह्यांच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेली, खिल्लारी बैलांसाठी तसेच भुसार मालासाठी प्रसिद्ध असलेली बाजार समिती म्हणून प्रसिद्ध आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Praveen Patil, a progressive farmer of Malshewge, former director Jitendra Vani, during the auction of mung beans in the market committee.
Jalgaon Agriculture News : जिल्ह्यात 108 टक्के कापसाची पेरणी; 91 टक्के पेरण्या पूर्ण

तालुक्यातील व आजूबाजूच्या पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपला शेतीमाल जास्तीत -जास्त विक्रीसाठी आणावा, असे आवाहन बाजार समितीचे नवनिर्वाचित सभापती कपिल पाटील, उपसभापती साहेबराव राठोड व नूतन संचालक मंडळ यांनी केले आहे.

याप्रसंगी बाजार समितीचे माजी संचालक जितेंद्र वाणी, पर्यवेक्षक प्रवीण पाटील, वरिष्ठ लिपीक संजय जाधव, व्यापारी सुरेश वाणी, हेमंत वाणी, राजेंद्र मांडे, राकेश छाजेड, अमेय येवले, प्रवीण बागड आदी उपस्थित होते.

Praveen Patil, a progressive farmer of Malshewge, former director Jitendra Vani, during the auction of mung beans in the market committee.
Jalgaon Agriculture News : ..अखेर 15 एकरातील कपाशी उपटून फेकली; तोंडापूर येथील शेतकरी हतबल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.