Jalgaon Municipal Commissioner : भाजप नगरसेवक व महापालिका आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांच्यातील मतभेदावर राज्याचे मंत्री व भाजप नेते गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार सुरेश भोळे, मंगेश चव्हाण यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत समझोता झाला.
त्यामुळे महापालिका आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांच्यावर दाखल केलेला प्रस्ताव मागे घेण्याचा निर्णय भाजप नगरसेवकांनी घेतला आहे. (Municipal Commissioner BJP corporators decided to withdraw motion filed against Dr Vidya Gaikwad jalgaon news)
भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी महापालिका आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांच्यावर अविश्वास प्रस्ताव सादर केला होता. त्यावर मंगळवारी (ता. १) मतदान घेण्यात येणार होते. विशेष म्हणजे शिवसेना शिंदे गट, शिवसेना ठाकरे गट व एमआयएमच्या नगरसेवकांनीही पाठिंबा दिला होता. मात्र, राज्यात भाजप शिंदे गटाची सत्ता व जिल्ह्यात दोन्ही पक्षाचे मंत्री असताना, त्यांच्याच नगरसेवकांनी आणलेल्या या प्रस्तावाबाबत राजकीय पडसाद उमटत होते.
मंगळवारी प्रस्तावाच्या मतदानाच्या पाश्र्वभूमीवर सोमवारी (ता. ३१) दिवसभर जोरदार राजकीय खलबते झाली. सायंकाळी येथील अजिंठा विश्रामगृहावर पालकमंत्री गुलाबराव पाटील, भाजप नेते व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, आमदार मंगेश चव्हाण, आमदार सुरेश भोळे यांच्या उपस्थितीत भाजप नगरसेवक व महापालिका आयुक्तांची संयुक्त बैठक झाली. त्यानंतर समझोता होऊन आयुक्तावरील अविश्वास ठराव मागे घेण्याचा निर्णय झाला.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
याबाबत राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले, की महापालिका आयुक्त व नगरसेवक यांच्यात विकासकामांवरून वाद होते. बैठकीत चर्चा झाली. विकासाकामांबाबत सुधारणा करण्यास आयुक्तांना सांगण्यात आले आहे. त्यानुसार त्या कामात सुधारणा करणार आहेत. त्यामुळे शहरात विकासकामे वेगाने होणार आहेत.
चर्चेमुळे नगरसवकांचे समाधान झाले असून, अविश्वासाचा हा प्रस्ताव मागे घेण्यात येणार आहे. विधानसभा अधिवेशन सुरू असल्यामुळे आम्ही त्या ठिकाणी होतो. त्याचदरम्यान नगरसेवक व आयुक्तात मतभेद झाल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली होती. यापुढे असे मतभेत होणार नाहीत, असेही मंत्री महाजन यांनी स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.