Jalgaon Municipal Commissioner : आपण मोठ्या प्रमाणात निधीचा वापर करून शहराचा विकास केला. त्यामुळे मी विकासकामांत खोडा घालीत आहे, असे म्हणणे चुकीचे आहे.
अविश्वास प्रस्ताव पारित करून प्रशासकीय अधिकाऱ्यांचे मनोबल खच्चीकरण होईल, असे मत महापालिका आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी व्यक्त केले. अविश्वास प्रस्तावावर त्यांनी आपला लेखी खुलासा सादर केला. (Municipal Commissioner Dr Vidya Gaikwad submitted her written discourse on no confidence motion jalgaon news)
महापालिका आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी तब्बल दोन पानी पत्र दिले. त्यात त्यांनी म्हटले आहे, की मी आयुक्त म्हणून रूजू झाल्यापासून शासकीय योजना व महापालिका निधी अंतर्गत होत असलेल्या कामांचे आदेश दिले आहेत. यात महापालिका निधी, दलित्तेतर, दलीत वस्ती, नगरोत्थान, मूलभूत सोयी-सुविधा या योजनेतून ८२ कोटी ४१ लाखांची कामे केली आहेत.
अमृत योजनेंतर्गत ७५ हजारांपैकी ३७ हजार नळकनेक्शनद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे. येत्या दोन महिन्यांत ही योजना पूर्ण होणार आहे. घनकचरा प्रकल्पही मार्गी लावण्यासाठी आपण प्रयत्न केले आहेत.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
लवकरच तो मार्गी लागणार आहे. बायोमायनिंग प्रकल्पाच्या कार्यारंभाचे आदेश दिले आहेत.
साफसफाईत चुकारपणा करणाऱ्या मक्तेदारास एक कोटी सहा लाख रुपयांचा दंड आकारला आहे. इतर विभागांचीही कामे केली आहेत. महिला बालकल्याण विभागांतर्गत शिष्यवृत्ती दिली आहे.
करवसुलीतही आपण यंदा तब्बल १११ कोटी ६१ लाख रुपयांची विक्रमी वसुली केली आहे. आपण पेन्शन व पगार दरमहा दिले आहेत. कामगारांमध्येही आपण शिस्तीचे वातावरण निर्माण केले आहे. कामचुकार कर्मचाऱ्यांना दंडही केला आहे. त्यामुळे आपण विकासकामांत खोडा घातला, हे म्हणणे चुकीचे होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.