जळगाव : औरंगाबाद ‘मॅट’मध्ये सुरू असलेली आयुक्तपदाची सुनावणी शुक्रवार (ता. १३)पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. न्यायाधीश रजेवर असल्याने बुधवारी (ता. ११) कोणतेही कामकाज झाले नाही. त्यामुळे ही सुनावणी पुढे ढकलण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
महापालिका आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी ‘मॅट’मध्ये दाखल केलेल्या बदलीच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर बुधवारी सुनावणी होती. (Municipal Commissioner Post Hearing Next date 13th as Judge is on leave Jalgaon News)
जळगावहून आयुक्तपदावरून झालेल्या बदलीला ‘मॅट’ने स्थगिती दिली आहे. मात्र, तत्पुरता पदभार आयुक्त देवीदास पवार यांच्याकडे दिला आहे.
पदभार देण्याबाबत सुनावणी सुरू आहे. बदली झालेल्या आयुक्त डॉ. विद्या गायकवाड व पदभार घेतलेले आयुक्त देवीदास पवार या दोन्हींच्या वकिलांचा युक्तिवाद झाला आहे. त्यामुळे ‘मॅट’कडून निकाल लागण्याची शक्यता आहे.
बुधवारी निकाल लागण्याची शक्यता होती. मात्र, काही कारणास्तव न्यायाधीश रजेवर असल्याने आता ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून, शुक्रवारी (ता. १३) सुनावणी होणार आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.