Jalgaon News : महापालिकेला योजना पूर्ण करता येईना; अमृत 1.0 अद्यापही अपूर्णच

Jalgaon Municipal Corporation
Jalgaon Municipal Corporationesakal
Updated on

Jalgaon News : महापालिकेवर हुडको, जिल्हा बँकेचे कर्ज असल्यामुळे शहरात विकासकामे होत नाहीत, असे सांगण्यात येत होते. मात्र, आजच्या स्थितीत महापालिकेला शासनाचा निधी मिळाला आहे.

तरीही रस्ते, भुयारी गटारील घनकचरा प्रकल्प, अमृत १.० योजना पूर्ण न झाल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. महापालिकेच्या आयुक्तांसह सर्वच अधिकारी त्याबाबत असमर्थ ठरल्याचे दिसत आहे. (Municipal Corporation could not complete yojna Roads sewers solid waste projects Amrit 1.0 still incomplete Jalgaon News)

जळगाव शहरात रस्त्याचा प्रश्‍न अत्यंत गंभीर झाला आहे. सर्वच भागांतील रस्ते खराब झाले आहेत. शहरातील रस्त्यांच्या कामासाठी मुख्यमंत्र्यांनी थेट शंभर कोटी निधी मंजूर केला. त्यातील ४२ कोटींचा निधी मिळाला.

त्यातूनही केवळ ३८ कोटींची कामे सुरू झाली. उर्वरित ६८ कोटींच्या निधीबाबत कोणीही बोलत नाहीत. ३८ कोटींच्या निधीतून शहरातील रस्त्यांची कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे देण्यात आली. मात्र, अद्यापही या निधीतील रस्त्यांची कामे पूर्ण झालेली नाहीत. त्यामुळे खड्डेमय रस्त्यांचा नागरिकांना अद्यापही त्रास सहन करावा लागत आहे.

Jalgaon Municipal Corporation
Jalgaon Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार या तारखेला जळगाव दौऱ्यावर

अमृत १.० योजना अपूर्णच

शहरातील पाणीपुरवठा योजना अत्याधुनिक करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून तब्बल २२०० कोटी रुपयांची अमृत १.० योजना शहरात राबविण्यास मंजुरी देण्यात आली. शहरातील पाणीपुरवठा करणारे सर्व अंतर्गत पाईप बदलून नागरिकांना नवीन कनेक्शन देणारी ही योजना आहे. यात दोन टप्पे केले आहेत.

मात्र, या योजनेच्या पहिल्या टप्प्याचेच काम अद्याप पूर्ण झालेले नाही. विशेष म्हणजे १५ हजार नळकनेक्शन सुरू झाला असल्याचा दावा महापालिका करीत आहे. प्रत्यक्षात अनेक ठिकाणी पाणीपुरवठा होत नसल्याच्या तक्रारी आहेत, तर दुसरीकडे महापालिकेतर्फे या योजनेंतर्गंत अद्याप काही ठिकाणी नळ जोडणीच केली नसल्याचे सांगण्यात येत आहे.

पहिला टप्प्याचीच ओरड सुरू आहे. त्यात आता दुसरा टप्पा सुरू करण्याबाबत आराखडा तयार करण्यापासूनच वाद सुरू झाला आहे. त्यामुळे ही योजना कधी पूर्ण होणार, हाच प्रश्‍न आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Jalgaon Municipal Corporation
Jalgaon Crime News : पोलिसांच्या समजनंतर महिलेचा विनयभंग; घेतलेल्या पैशांपोटी बळकावले घर

भुयारी गटारी प्रकल्प अंधातरीच

शहरात भुयारी गटारी योजना प्रकल्प राबविण्यासाठी केंद्र सरकारतर्फे ६५० कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. योजनेच्या प्रकल्पासाठी महापालिकेने जागा द्यावयाची आहे. मक्तेदारातर्फे या योजनेंतर्गत काम सुरू करण्यात आले आहे.

शहरात तीन ठिकाणी या योजनेंतर्गत सांडपाणी जमा करून त्यावर प्रकल्प उभारायचे आहेत. यातील पहिल्या टप्प्यातील योजनाही अद्याप पूर्ण झालेली नाही. शिवाजीनगर भागात लेंडी नाल्यालगत असलेल्या जुन्या खत कारखान्याजवळ प्रकल्प उभारण्यात आला आहे.

मात्र, अद्यापही त्या प्रकल्पाला वीजपुरवठा करण्यात आलेला नाही. तीन वेळा निविदा काढूनही त्याला प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे त्याची चाचणीही झालेली नाही. परिणामी, या योजनेंतर्गत जोडणीही झालेली नाही. तर शहरात इतर दोन ठिकाणी सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याच्या प्रकल्पासाठी महापालिकेला अद्यापही जागा सापडलेली नाही. सर्वच बाबत हा प्रकल्पही अंधातरीच आहे.

Jalgaon Municipal Corporation
Jalgaon News : Credit Card चे Limit वाढवायचे सांगत फसवणुक; तरुणाच्या खात्यातून 35 हजार लंपास

घनकचरा प्रकल्पाचे भिजत घोंगडे

शहरात रोज जमा होणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी घनकचरा प्रकल्प उभारण्यासाठी शासनाने तब्बल ४८ कोटी रुपये मंजूर केले आहेत. शासनातर्फे हा निधीही उपलब्ध आहे. मात्र, मक्तेदाराच्या वादामुळे गेल्या पाच वर्षांपासून हा प्रकल्प रखडला आहे.

त्यावर निर्णय घेण्यास महापालिका असमर्थ ठरत आहे. कचऱ्यावर प्रक्रिया होत नसल्यामुळे महापालिकेतर्फे आव्हाणी परिसरात कचऱ्याचे ढीग साठविले जात आहेत. या कचऱ्याला आग लावल्यानंतर होणाऱ्या धुरापासून आजूबाजूच्या नागरिकांना त्रास होऊ लागला आहे.

Jalgaon Municipal Corporation
Crime News: लुडो खेळता खेळता झाली मैत्री, प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं अन् अश्लील व्हिडिओ केला व्हायरल

आयुक्तांसह अधिकारी असमर्थ

महापालिकेच्या योजना पूर्ण करून घेण्याची जबाबदारी आयुक्तांची असते. मात्र, आयुक्त डॉ. विद्या गायकवाड याबाबत असमर्थ आहेत. महापालिकेत या योजनांसाठी प्रकल्प अधिकारी योगेश बोरोले आहेत, तसेच संजय नेमाडे यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.

मात्र, तेही या योजना पूर्ण करण्याबाबत तातडीने कार्यवाही करताना दिसत नाहीत. महापालिकेच्या चालढकलपणामुळे या योजना रखडल्या आहेत. मात्र, त्याचा त्रास नागरिकांना होत आहे.

"शहरातील प्रकल्प पूर्ण करण्याबाबत आपण वेळोवेळी पाठपुरावा करीत आहोत. याबाबत आवश्‍यक तो पत्रव्यवहारही केला आहे. मात्र, अधिकारी तेवढ्या गतीने काम करीत नसल्यामुळे या योजना पूर्ण झालेल्या नाहीत."

-जयश्री महाजन, महापौर, जळगाव

Jalgaon Municipal Corporation
Jalgaon Riot News : निरपराध नागरिकांना अटक करू नका; आमदार अनिल पाटील यांच्या सूचना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.