Jalgaon Municipality News : सावधान...! रस्त्यावर दुचाकी पार्क करू नका जप्त होईल

शहरातील रस्ते दुचाकी तसेच चार चाकी पार्किंग तसेच विक्रेत्यासाठी नाहीत ते वाहतुकीसाठी आहेत.
Municipal Corporation decided to confiscate two wheelers parked on road
Municipal Corporation decided to confiscate two wheelers parked on roadesakal
Updated on

Jalgaon News : शहरातील रस्ते दुचाकी तसेच चार चाकी पार्किंग तसेच विक्रेत्यासाठी नाहीत ते वाहतुकीसाठी आहेत. परंतु संकुल धारकांनी पार्किंग सुविधा न करताच संकुल बांधले आहे.

संकुलावरील कारवाईनंतर आता महापालिकेने रस्त्यावर लावण्यात पार्किंग करण्यात येणाऱ्या दुचाकी वाहनांवर जप्तीची कारवाई करण्याचा निर्णय घेतला असून बुधवार (ता.१०)पासून ही नेहरू चौक ते शास्त्री टॉवर दरम्यानच्या रस्त्यावर ही कारवाई करण्यात येणार आहे. (Municipal Corporation decided to confiscate two wheelers parked on road jalgaon news)

शहरातील अनेक संकुलांच्या दुकानासमोरच रस्त्यावर वाहने पार्किंग होत असल्याने रस्त्यावरील वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. तसेच रस्त्यावर विक्रेत्यांचे अतिक्रमण होत आहे. त्यामुळे वाहनधारकांना अडथळ्याची शर्यत करावी लागत आहे.

रस्त्यावरील अतिक्रमण टाळण्यासाठी महापालिकेने प्रथम संकुलातील दुकानदारांना तळमजल्यावर वाहनतळ करण्याची नोटीस बजावली होती. ज्यांनी वाहनतळ केले नाही.

त्यांची दुकाने सील करण्याची कारवाई करण्यात आली, पहिल्या टप्प्यात केवळ पाच दुकानावर कारवाई करण्यात आली त्या पैकी दोन दुकानदारांनी आपल्या दुकानांच्या तळमजल्यावर रॅम्प करून पार्किंग सुविधा केली आहे.

परंतु अद्यापही तीन दुकानदारांनी सुविधा केलेली नाही, या शिवाय इतर दुकानदारही त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

Municipal Corporation decided to confiscate two wheelers parked on road
Jalgaon municipality News : घनकचरा प्रकल्पासाठी निमखेडी, पिंप्राळा येथील जागा उपलब्ध करा; जिल्हाधिकाऱ्यांचे पत्र

दुभाजकापासून १२ मीटरनंतर पार्किंग

महापालिकेतर्फे शहरातील रस्त्यावर पार्किंगचे पिवळे पट्टे मारणार आहे. रस्ते दुभाजकापासून बारा मीटर अंतरावर पिवळे पट्टे मारण्यात येतील त्या पिवळ्या पट्ट्याच्या पुढे वाहन पार्किंग करावयाचे आहे.

जी वाहने पिवळ्या पट्ट्याच्या बाहेर उभे असतील त्यांच्यावर जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे.

नेहरू चौक ते टॉवर मोहीम

महापालिकेतर्फे बुधवारी (ता.१०) रोजी नेहरू चौक ते शास्त्री टॉवर रस्त्यावर ही मोहीम राबविण्यात येणार आहे, त्यासाठी अतिक्रमणाचे पथकही नियुक्त करण्यात आले आहे. तसेच शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांची मदतही घेण्यात येणार आहे.

पिवळ्या पट्ट्याच्या बाहेर जी वाहने रस्त्यावर उभी असतील ते वाहतूक पोलिस जप्त करून घेण्यात आहेत.

Municipal Corporation decided to confiscate two wheelers parked on road
Jalgaon News : नायलॉन मांजा विक्रेत्यावर धाड; 5 हजाराचा दंड

अतिक्रमणही हटविणार

नेहरू चौक ते शास्त्री टॉवर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात विक्रेत्यांचे अतिक्रमण आहे. चारचाकी रस्त्यावर लावून विक्रेते बसलेले असतात, जुन्या जिल्हा बँकेसमोरही कपडे विक्रेत्याचे रस्त्यावरच दुकान आहे.

रस्त्यावरील या विक्रेत्यावरही कारवाई करण्यात येणार असल्याचे महापालिकेच्या अतिक्रमण विभागातर्फे सांगण्यात आले.

"महापालिका प्रशासक तथा आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी शहरातील अतिक्रमण हटविण्याचे तसेच रस्त्यावर पार्किंग करण्यात येणाऱ्या वाहनांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. शहर वाहतूक शाखेलाही पत्र देण्यात आले आहे, त्यामुळे संयुक्तपणे ही कारवाई करण्यात येणार आहे." - उमाकांत नष्टे निरीक्षक, अतिक्रमण निर्मूलन पथक, महापालिका

Municipal Corporation decided to confiscate two wheelers parked on road
Jalgaon News : विकास दूध ग्राहकांसाठी 2 रुपये लिटरने स्वस्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.