Jalgaon Municipality Recruitment : महापालिकेत कर्मचारी भरती; महापौर जयश्री महाजन यांची माहिती

Jalgaon Municipal Corporation
Jalgaon Municipal Corporationesakal
Updated on

Jalgaon Municipality Recruitment : महापालिकेत सहा महिन्यांच्या कंत्राटी पद्धतीने कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येणार आहे, अशी माहिती महापौर जयश्री महाजन यांनी पत्रकार परिषदेत दिली.

१९९७ मध्ये नगरपालिका असताना कर्मचारी भरती करण्यात आली होती. महापालिका झाल्यावर तत्कालीन आयुक्त प्रकाश बोखड यांनी कर्मचारी भरती केली होती. त्यानंतर मात्र कोणतीही भरती झालेली नाही. (municipal corporation Employees will be recruited in on contract basis for 6 months jalgaon news)

आजच्या स्थितीत महापालिकेत मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची निवृत्ती झाली. त्यामुळे कर्मचाऱ्यांची कमतरता जाणवत आहे. त्याचा परिणाम दैनंदिन कामावरही होतो. महापालिकेत कर्मचारी भरतीसाठी आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी आकृतिबंध तयार करून शासनाला पाठविला होता.

त्याला शासनाने मंजुरीही दिली आहे. मात्र, कर्मचारी भरतीसाठी नियमवाली शासनाकडून प्राप्त झालेली नाही. त्याची अद्याप प्रतीक्षा आहे. दुसरीकडे कर्मचारी कमी असल्याने नागरिकांची कामे करण्यास विलंब होतो. त्यामुळे महासभेत कंत्राटी भरतीसाठी ठराव मंजूर करण्यात आला होता.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Jalgaon Municipal Corporation
Netflix Jobs: नेटफ्लिक्स देतंय बंपर नोकरीची ऑफर! पगार ऐकून बसेल धक्का

महासभेने मंजूर केलेल्या ठरावानुसार कंत्राटी भरती करण्यासाठी महापौर महाजन यांनी आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांची भेट घेतली. आयुक्तांनीही सकारात्मकता दाखविली असल्याची माहिती महापौर महाजन यांनी दिली.

सौ. महाजन यांनी सांगितले, की सहा महिन्यांच्या कंत्राटी पद्धतीने कर्मचारी भरतीची प्रक्रिया आयुक्त लवकरच सुरू करणार आहेत. प्रत्येक विभागातून पदांची संख्या मागवून आवश्‍यकतेनुसार कर्मचारी भरती करण्यात येईल. याबाबत आयुक्तांनी प्रत्येक विभागाकडून माहिती मागविली असल्याचेही महापौर महाजन यांनी सांगितले.

Jalgaon Municipal Corporation
Jalgaon ZP Recruitment: जळगाव जिल्हा परिषदेत 626 पदांची होणार भरती; 5 ऑगस्टपासून प्रक्रिया

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.