Municipal Corporation News : महापालिका आयुक्तपदी डॉ. विद्या गायकवाड कायम

Jalgaon Municipal Corporation
Jalgaon Municipal Corporationesakal
Updated on

जळगाव : महापालिका आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांचा बदलीचा आदेश रद्द ठरवून आयुक्तपदी डॉ. विद्या गायकवाड यांची नियुक्ती करावी, असा आदेश ‘मॅट’ने दिला आहे. या आदेशामुळे शासनाला चपराकच बसली आहे.

मात्र, शासन व आयुक्त देवीदास पवार यांना निकालाविरुद्ध अपिलात जाण्यासाठी एक आठवड्याची मुदत दिली आहे. या कालावधीत देवीदास पवार हेच आयुक्त राहणार आहेत. मात्र, अपिलात न जाता शासनाने डॉ. गायकवाड यांच्या नियुक्तीचे आदेश काढल्यास त्या पदभार घेऊ शकतात. त्यामुळे नियमित आयुक्तपदासाठी एक आठवड्याची प्रतिक्षा अद्यापही जळगावकरांना आहे. (Municipal Corporation News Municipal Commissioner Dr. Vidya Gaikwad is continue on post Jalgaon News)

Jalgaon Municipal Corporation
Nashik News : ट्रीपल सीट दुचाकीस्वारांवर कारवाई; एमजी रोडवर अर्ध्यावर अनधिकृत पार्किंग

२९ नोव्हेंबर २०२२ ला महापालिका आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांच्या बदलीचे आदेश आले. त्यांच्या पदावर परभणी येथील आयुक्त देविदास पवार यांची नियुक्ती करण्यात आली. आदेशानुसार श्री. पवार यांनी जळगावला येऊन पदभार स्वीकारला. त्यावेळी डॉ. गायकवाड पुण्याला प्रशिक्षणासाठी गेल्या होत्या.

हा एकतर्फी पदभार स्वीकारण्यात आला असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांच्या नियुक्तीला केवळ सहा महिने झाले होते. तसेच बदलीचे कोणतेही कारण नसताना ही अचानक बदली का करण्यात आली, असा प्रश्न उपस्थित करून त्यानी ‘मॅट’मध्ये अर्ज दाखल केला. न्यायमूर्ती पी. आर. बोरा यांच्यासमोर याचे कामकाज झाले.

‘मॅट’ने डॉ. गायकवाड यांच्या बदलीला स्थगिती दिली. मात्र, निकाल लागेपर्यंत देविदास पवार हेच आयुक्तपदी राहतील, असे आदेश दिले होते. ‘मॅट’मध्ये तब्बल दोन महिने सुनावणी चालली. अखेर मंगळवारी (ता. ३१) निकाल लागला. त्यात डॉ. गायकवाड यांना दिलासा मिळाला आहे. त्यांची जळगाव मनपा आयुक्तपदी नियुक्ती करावी व देविदास पवार यांची दुसऱ्या ठिकाणी नियुक्ती करण्याचे आदेश दिल्याचे सांगण्यात आले.

हेही वाचा : T+1 Settlement मुळे वाढेल शेअर बाजारातली उलाढाल

Jalgaon Municipal Corporation
Jalgaon Crime News : खरे पोलिस गायब, तोतया पोलिसांनी घेतला Charge

अपिलासाठी एक आठवड्याची मुदत

महापालिका आयुक्त देविदास पवार यांनीही याबाबत याचिका दाखल केली होती. निकाल लागल्यानंतर श्री. पवार यांच्या वकिलांनी आम्हाला अपिलात जाण्यासाठी वेळ मागितला. न्यायालयाने ते मान्य करून एक आठवड्याची मुदत दिली. या काळात शासनाने किंवा आयुक्त पवार यांनी अपील दाखल केले, तर त्या निकालापर्यंत देविदास पवार हेच आयुक्त राहतील. मात्र, शासनाने आदेश काढून आयुक्तपदी डॉ. गायकवाड यांची नियुक्ती केली, तर त्या आदेशाची अमंलबजावणी होईल.

दोन महिन्यांनी नियमित आयुक्त

महापालिकेच्या आयुक्तपदाचा वाद दोन महिन्यांपासून सुरू आहे. देविदास पवार यांची आयुक्तपदी नियुक्ती होती. मात्र, त्यांना ‘मॅट’ने कोणतेही धोरणात्मक निर्णय घेण्यास मनाई केली होती. त्यामुळे नागरिकांची अनेक कामे अडकली होती. ‘मॅट’च्या निर्णयामुळे महापालिकेला आता नियमित आयुक्त मिळणार आहे. मात्र, त्याला आता एक आठवड्याच्या कालावधीची प्रतिक्षा आहे. आयुक्त विद्या गायकवाड यांच्यातर्फे अविनाश एस. देशमुख, तर शासनातर्फे आय. एस. थोरात आणि देविदास पवार यांच्यातर्फे एस. एस. ठोंबरे यांनी बाजू मांडली.

Jalgaon Municipal Corporation
MSTC Jalgaon News : Smart Card साठी 31 मार्चची Deadline

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.