Jalgaon Municipality News : शहरातील वाढते प्रदूषण टाळण्यासाठी महापालिकेतर्फे बुधवारी (ता. ६) ‘नो-व्हेइकल-डे' पाळण्यात आला.
महापालिका आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांच्यासह अधिकारी व कर्मचारी वाहनाऐवजी कार्यालयात पायी आणि सायकलींवरून आले.(Municipal Corporation observe No Vehicle Day jalgaon news)
महापालिकेतर्फे शहरातील प्रदूषण टाळण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यातंगर्त वाहनामुळे होणारे प्रदूषण टाळण्यासाठी ‘नो-व्हेइकल-डे' उपक्रम राबवण्यास सुरुवात झाली. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कार्यालयात येताना कोणतेही वाहन न घेऊन येण्याचे कळवण्यात आले होते.
त्यानुसार कर्मचारी व अधिकाऱ्यांनी त्यास प्रतिसाद दिला. कोणतेही वाहन न घेऊन अधिकारी व कर्मचारी आले होते. डॉ. गायकवाड, उपायुक्त अश्विनी भोसले-गायकवाड, निर्मला गायकवाड-पेखळे, मुख्य लेखाधिकारी चंद्रकांत वानखेडे, मुख्य लेखापरीक्षक मारोती मुळे, सहाय्यक आयुक्त अभिजित बाविस्कर हे पायी कार्यालयात आले.
सहाय्यक आयुक्त उदय पाटील आणि इतर अधिकारी सायकलवरून पोचले. महापालिका अभियंता प्रकाश पाटील, सफाई कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अजय घेंगट यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
महापालिकेतर्फे ‘नो-व्हेइकल-डे’ शंभर टक्के यशस्वी झाल्याचे स्पष्ट करण्यात आले. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या बुधवारी महापालिकेतर्फे ‘नो-व्हेइकल-डे' पाळण्यात येणार आहे. शहरातील सरकारी व खासगी कार्यालयातर्फे ‘नो-व्हेइकल-डे' पाळण्यात येणार आहे. त्याबाबत अधिकाऱ्यांना पत्र देण्यात आले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.