Jalgaon News : महापालिकेची धडक कारवाई; संकुलधारकांमध्ये घबराट

D. H. Action taken on ground floor shop in Plaza complex.
D. H. Action taken on ground floor shop in Plaza complex.esakal
Updated on

जळगाव : शहरातील व्यापारी संकुलात तळमजल्यावर अनेक जणांनी अनधिकृत दुकाने (Shops) काढली आहेत. याबाबत महापालिकेत तक्रारीही प्राप्त झाल्या आहेत.

त्यावर आता महापालिकेने कारवाई सुरू केली आहे. (Municipal Corporation took action against unauthorized shops on ground floor in commercial complex of city jalgaon news)

मंगळवारी (ता. २१) पहिला हातोडा भवानी मंदिरासमोरील डी. एच.प्लाझा इमारतीतील तळमजल्यावर चार दुकानांवर पडला आहे. आता इतर संकुलातील तळमजल्यावही कारवाई करण्यात येणार आहे.

शहरातील इमारतीच्या तळघरातील सर्वेक्षण नगररचना विभागाने केले आहे. त्यानुसार अनेक इमारतींच्या तळमजल्यावर व्यवसायिक वापर अनधिकृतपणे होत असल्याचे दिसून आले आहे. यावर महापालिकेने कारवाई केली नव्हती. आरटीआय कार्यकर्ते दीपकुमार गुप्ता यांनी अनेकदा याबाबत आंदोलन केले होते.

अखेर महापालिकेतर्फे यावर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. महपालिका नगररचना विभागाने अतिक्रमण निर्मूलन विभागाला भवानी मंदिरासमोरील डी. एच. प्लाझा इमारतीच्या तळमजल्यावरील अतिक्रमण पाडण्याचे आदेश दिले.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

D. H. Action taken on ground floor shop in Plaza complex.
Jalgaon News : ...थोडक्यात हुकले ‘खून का बदला खून’चे थरारनाट्य

त्यानुसार मंगळवारी सकाळी सराफ बाजारातील डी. एच. प्लाझामधील पार्किंगच्या जागांवरील अनधिकृत चार दुकानांचे बांधकाम पाडण्यात आले. ही कारवाई अतिक्रमण निर्मूलन विभागाचे प्रमुख उमाकांत नष्टे, सुनील ठाकूर यांच्या पथकाने केली.

वाहनतळाची मंजुरीनंतर दुकाने

याबाबत अतिक्रमण विभागाचे सुनील ठाकूर यांनी सांगितले, की डी. एच. प्लाझाचे मालक दिलीपकुमार हिराचंद यांनी इमारतीच्या बांधकाम परवानगी घेताना पार्किंग दाखविली होती. मात्र, येथे चार दुकाने काढली होती.

हे अनधिकृत बांधकाम मंगळवारी पाडून पार्किंगसाठी जागा खुली केली आहे, तर इमारतीच्या पहिल्या व दुसऱ्या मजल्यावरील संडास, बाथरूमच्या जागेवर दोन अनधिकृत दुकाने आढळून आली. हे दुकाने पाडण्याचे आदेश काढले आहेत. बुधवारी (ता. २२) ती दुकानेही पाडण्यात येणार आहेत.

D. H. Action taken on ground floor shop in Plaza complex.
Board Exam : कॉपीमुक्त अभियानाचा परीक्षा केंद्रांवर आढावा; जिल्हा परिषद सीईओंनी दिली शाळांना भेट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.