Jalgaon News : शहराच्या रस्त्यांवरील अतिक्रमणाला दणका

महापालिकेतर्फे मंगळवारी (ता.१३) सुभाष चौक, चौबे मार्केट व दाणाबाजार रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्याची धडक कारवाई केली.
Employees of Municipal Encroachment Removal Department while removing encroachment in Dana Bazaar.
Employees of Municipal Encroachment Removal Department while removing encroachment in Dana Bazaar.esakal
Updated on

Jalgaon News : शहरातील अतिक्रमण मोठ्या प्रमाणात वाढल्याच्या तक्रारी आहेत. महापालिकेतर्फे मंगळवारी (ता.१३) सुभाष चौक, चौबे मार्केट व दाणाबाजार रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्याची धडक कारवाई केली. यात काही विक्रेत्यांच्या गाड्याही जप्त केल्या.

महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाचे प्रमुख अतुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली विभागातर्फे अतिक्रमण निर्मूलनाची मोहीम राबविण्यात आली. (Municipal Corporation took action on due to complaint that encroachment in city has increased to large extent jalgaon news)

सकाळी अकरा वाजता पथकातर्फे ही कारवाई झाली. रस्त्यावर बसलेल्या भाजी तसेच फळ विक्रेत्यांच्या गाड्या जप्त केल्या. सुभाष चौकात पुतळ्याच्या आजूबाजूला बसलेल्या विक्रेत्यांवरही कारवाई केली. त्यानंतर दाणाबाजारात बाहेर ठेवलेल्या तेलाच्या टाक्या जप्त करण्यात आल्या.

रस्ता झाला मोकळा

महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने रस्त्यावरील विक्रेत्यांवर कारवाई केल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी मोकळा झाला होता. दुपारी एक वाजेपर्यंत अतिक्रमण निर्मूलन विभागाचे पथक याच ठिकाणी ठाण मांडून होते, त्यामुळे अतिक्रमण करणारे फळ व भाजपला विक्रेते रस्त्यावर आलेच नाहीत.

अनेक दिवसानंतर कारवाई

महापालिकेतर्फे अनेक दिवसानंतरही अतिक्रमणाची कारवाई झाली आहे. अतिक्रमण विभाग आता उपायुक्त गणेश चाटे यांच्याकडे दिला आहे.

Employees of Municipal Encroachment Removal Department while removing encroachment in Dana Bazaar.
Jalgaon News : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा जळगाव दौरा स्थगित

तर अतिक्रमण विभागप्रमुखपदी अतुल पाटील यांची स्वतंत्र नियुक्ती केली आहे. नियुक्तीनंतर त्यांनी प्रथमच धडक कारवाई सुरू केली आहे. अतिक्रमण निर्मूलन विभागाचे उमाकांत नष्टे, संजय ठाकूर यांनीही त्यांना सहकार्य केले.

कारवाई आता सुरूच राहणार

शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याच्या तक्रारी येत आहेत. तसेच वाहतुकीलाही अडथळा होत आहे. त्यामुळे रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्यासाठी अतिक्रमण विभागाच्या पथकाने आता ही मोहीम सुरू केली आहे.

ही मोहीम आता सुरूच राहणार आहे. रस्त्यावर अतिक्रमण करणारे विक्रेत्यांचे साहित्य जप्त करण्यात येईल, असेही अतिक्रमण निर्मूलन पथकाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Employees of Municipal Encroachment Removal Department while removing encroachment in Dana Bazaar.
Jalgaon News : विद्यार्थी कॉपी करताना आढळल्यास कारवाई : माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. कुंवर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.