Jalgaon News : समाननिधी वाटपाची भूमिका गेल्या 4 वर्षात का नाही? विरोधकांची टिका

Jalgaon Municipal Corporation
Jalgaon Municipal Corporationesakal
Updated on

Jalgaon News : शासनाकडून विकासकामासाठी आलेला निधी नगरसेवकांना समान वाटपाची अत्यंत चांगली भूमिका आयुक्तांनी घेतली आहे, परंतु मागील चार वर्षांत असा निधी का वाटप झाला नाही? असा प्रश्‍न विरोधकांनी उपस्थित केला आहे. (Municipal Councilor question mayor about same fund distribution jalgaon news)

शासनाकडून प्राप्त झालेल्या ३१ कोटीच्या निधीतून सर्व नगरसेवकांना प्रभागाच्या विकासासाठी समान निधी वाटप करण्यात येणार असल्याची भूमिका महापौर जयश्री महाजन यांनी जाहिर केली आहे. त्याबाबतचे प्रस्ताव नगरसेकांनी सादर करावेत असे अवाहनही त्यांनी केले आहे. त्यांच्या या भूमिकेचे विरोधकांसह सर्वच नगरसेवकांनी स्वागत केले आहे.

मात्र, गेल्या चार वर्षाचा निधीही अशाच पद्धतीने वाटप झाला असता, तर सर्वच प्रभागाचा विकास झाला असता, असे मतही त्यांनी व्यक्त केले आहे. भारतीय जनता पक्षाचे गटनेते राजेंद्र घुगे पाटील म्हणाले, की महापौरांची भूमिका चांगली आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Jalgaon Municipal Corporation
Jalgaon Municipality Recruitment : महापालिकेत कर्मचारी भरती; महापौर जयश्री महाजन यांची माहिती

त्यातून सर्वच भागाचा विकास होईल. मात्र, यापूर्वी आलेला निधी काही नगरसेवकांनी परस्पर घेवून प्रभागाचा विकास केला आहे. तर, काही नगरसेवकांना कोणताच निधी मिळालेला नाही. त्यामुळे ज्या नगरसेवकांना निधी मिळालेला नाही, त्यांना आता जास्त निधी देण्याचा विचार करण्यात यावा.

शिवसेना शिंदे गटाचे गटनेते ॲड. दिलीप पोकळे यांनी म्हटले आहे, कि सर्व नगरसेवकांना समाननिधी वाटपाचा निर्णय चांगला आहे. परंतु गेल्या चार वर्षात जिल्हा नियोजन मंडळाकडून आलेला निधी आता कोणत्या भागात तो वापरला गेला आहे.

याचा विचार करून ज्या भागात निधी मिळालेला नाही, त्या भागातील नगसेवकांना आता हा निधी देण्यात यावा. याबाबत आम्ही आयुक्तांना प्रस्ताव देणार आहोत असेही त्यांनी सांगितले.

Jalgaon Municipal Corporation
Jalgaon News : जिल्हा नियोजन मंडळाचा 31 कोटींचा निधी प्राप्त : महापौर जयश्री महाजन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.