Jalgaon News : मेहरुण तलाव परिसरात स्वच्छता राहावी म्हणून महानगरपालिकेने महिन्यापूर्वी लावलेल्या प्लॅस्टिकच्या कचराकुंडी अज्ञात समाजकंटकांनी फटाके लावून तोडून टाकल्या.
मेहरुण तलाव चौपाटीवर नेहमी अशी कृत्ये करत फिरणाऱ्या तरुणांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. (Municipal dustbin were set on fire from unknown jalgaon news)
जळगाव शहराला मेहरुण तलाव ही लाभलेली मोठी नैसर्गिक देणगी आहे. तलावाकाठी महापालिकेने गणेश घाट विकसित केल्यानंतर त्याच्या सौंदर्यात भर पडली आहे. मात्र, परिसरातील जनावरे तलावातील पाणी खराब करतात. काही समाजकंटक त्याठिकाणी जमा होऊन बसण्यासाठी ठेवलेले बाक, कचरा कुंड्यांचे नुकसान करतात.
एका दानशूर व्यक्तीने त्याच्या आईच्या स्मृतीनिमित्त चौपाटीवर ठेवलेल्या बाकांची तोडफोड करण्यात आली होती. आता नव्याने महिनाभरापूर्वी महापालिकेने याठिकाणी ओला व सुका कचरा टाकण्यासाठी हिरव्या व निळ्या रंगाच्या प्लॅस्टिकच्या कुंड्या ठेवल्या होत्या. त्यादेखील काही जणांनी त्यात फटाके लावून तोडून ठेवल्या आहेत.
मेहरुण तलाव परिसर स्वच्छ व आरोग्यदायी असावा, परिसरात अनेक लोक सकाळ-संध्याकाळ फिरायला येत असल्यामुळे निरोगी वातावरण राहावे असा महापालिकेचा हेतू होता. मात्र तलाव परिसरामध्ये फेरफटका मारला असता, जवळपास सगळ्या दहा कुंड्यांना आग लावलेली दिसली.
मिळालेल्या माहितीनुसार त्या कुंड्यांमध्ये फटाके फोडण्यात आले. त्यामुळे कुंड्यांचे नुकसान झाले. स्वच्छ जळगाव, सुंदर जळगाव चर स्वप्न बघणाऱ्या महापालिकेच्या योजनेवर विकृतांनी आगीचा बोळा फिरवला.
कुंड्या ज्या लोखंडी जाळ्यांमध्ये ‘फीट' केल्या होत्या, त्यादेखील चोरटे घेऊन जाण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे या परिसरात आगामी काळात काही विकासाचे प्रकल्प केले, तर तिथे सुरक्षा रक्षक नेमावे लागतील. तसेच पोलिसांनी या परिसरात गस्त घालून, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी शहरवासीयांमधून होत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.