Municipal Online Services : मनपा नगररचना विभागाच्या परवानगी ऑनलाईन देण्यास प्रारंभ

Jalgaon Municipal Corporation
Jalgaon Municipal Corporationesakal
Updated on

जळगाव : महापालिकेच्या नगररचना विभागातून १ एप्रिलपासून नागरिकांना घर बांधकाम, बांधकाम पूर्णत्वाचा दाखला ऑनलाईन मिळत आहे. (Municipal Town Planning Department has started giving permission online jalgaon news)

नागरिकांना घर, दुकाने बांधकाम करण्यासाठी महापालिकेची परवानगी घ्यावी लागते, तसेच बांधकाम पूर्ण झाल्याचा दाखला घ्यावा लागतो.

नागरिकांना ऑफलाईन परवानगी घेताना मोठ्या प्रमाणात अडचणी येत होत्या. अनेकवेळा अभियंते त्यात त्रुटी काढून नागरिकांना विनाकारण त्रास देत असल्याच्या तक्रारीही झाल्या होत्या. याबाबत महासभेत अनेकवेळा प्रश्‍न निर्माण झाले होते. परवानगी तातडीने आणि वेळेवर मिळण्यासाठी आता ऑनलाईन पद्धतीने परवानगी देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

हेही वाचा : शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?

Jalgaon Municipal Corporation
Jalgaon News : तळमजल्यावरील दुकानावर कारवाईचे लवकर धोरण

जळगाव महापालिकेत त्याची १ एप्रिलपासून अमंलबजावणी करण्यात येत आहे. नागरिकांनी आपल्या आर्किटेक्टच्या माध्यमातून ऑनलाईन परवानगीसाठी अर्ज दाखल करून कागदपत्रे जोडावयाची आहेत. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीनेच आर्किटेक्टकडे त्याची मंजुरी दिली जाईल. यासाठी आता नागरिकांना महापालिकेत येण्याची कोणतीही गरज नाही.

"शासनाच्या आदेशाप्रमाणे नगररचना विभागातर्फे आता सर्व परवानगी ऑनलाईन पद्धतीने देण्यात येत आहेत. नागरिकांनी आता परवानगीसाठी कोणत्याही प्रकारे ऑॅफलाईन अर्ज करू नयेत. ते स्वीकारले जाणार नाहीत." -के. पी. बागूल, सहाय्यक संचालक, नगररचना विभाग, महापालिका

Jalgaon Municipal Corporation
Amrut Yojana : नागरिकांचा महापालिकेविरोधात आक्रोश; ‘अमृत’च्या रस्त्याच्या कामास विलंब

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.