Jalgaon News : मनपा निधी नियोजनासाठी आयुक्तांची कसोटी; कर्जमुक्तीमुळे महापालिका आर्थिक सक्षम

jalgaon municipal corporation news
jalgaon municipal corporation newsesakal
Updated on

Jalgaon News : जळगाव महापालिका आता संपूर्णपणे कर्जमुक्त झाली आहे. कर्जफेडीसाठी लागणारे दरमहा तीन कोटी रुपये आता महापालिकेच्या तिजोरीत जमा होत आहेत. (Municipalities financially empowered due to debt relief jalgaon news)

याशिवाय घरपट्टी, खुला भूंखड कर, बांधकाम परवानगी फीही मोठ्या प्रमाणात जमा होत आहे. अशा स्थितीत महापालिकेच्या या फंडातून विकासकामांचे नियोजन होणार, की शासनाच्या निधीवरच अवलबूंन राहणार, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. महापालिका निधीचे नियोजन करण्याची आयुक्तांची आता खरी कसोटी आहे.

जळगाव महापालिकेवर १९९५ पासून कर्ज होते. हुडको, जिल्हा बँकेच्या कर्जापोटी महापालिकेच्या तिजोरीवर मोठ्या प्रमाणात ताण होता. कर्जफेडीसाठी महापालिकेची मोठी रक्कम जात असल्यामुळे विकासकामांना अडथळा येत होता.

कोणत्याही कामासाठी निधी उपलब्ध होत नसल्यामुळे शासनाच्या निधीवरच अवलंबून राहावे लागत होते. अगदी गल्लीतील गटारीच्या कामासाठी आमदार व खासदार निधीची प्रतिक्षा करावी लागत होती. नगरसेवक या निधीतून आपल्या भागात कामे कशी होतील, यासाठी प्रयत्नशील होते. अनेकांनी असा निधी मिळवून आपल्या प्रभागात कामेही केली आहेत.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

jalgaon municipal corporation news
Jalgaon Bypoll Election : 82 ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका जाहीर

शासनाचाही निधी

महापालिकेला वेळोवेळी शासनाचा निधीही उपलब्ध झाला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २५ कोटींचा निधी दिला होता. त्यानंतर आता रस्त्यांच्या कामासाठी ४२ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. त्यातून शहरातील विविध भागांतील रस्त्यांची कामे सुरू आहेत. याशिवाय आता पुन्हा शंभर कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यातून रस्त्यांची कामे होणार आहेत.

महापालिका निधीचे नियोजन होणार का?

एकेकाळी कर्जबाजारी असलेली जळगाव महापालिका आज खऱ्या अर्थाने संपूर्णपणे कर्जमुक्त झाली आहे. शासनाकडून महापालिकेला मिळणाऱ्या निधीतून कर्जाच्या रकमेची कपात होत होती. त्यावेळी तीन कोटी शासनाचे व एक कोटी जिल्हा बँकेची कर्जफेड होत होती. त्यामुळे दरमहा तब्बल चार कोटी रुपयांचा निधी कर्जफेडीत जात होता.

आता मात्र कर्जफेड झाल्यामुळे दरमहा चार कोटींचा निधी महापालिकेच्या तिजोरीत थेट येणार आहे. घरपट्टीची तब्बल शंभर कोटीपर्यंतची रक्कम जमा होत आहे, तर नगररचना विभागाकडून देण्यात येणाऱ्या विविध परवानीपोटी तब्बल २५ ते ३० कोटी दरवर्षी जमा होत आहेत. व्यापारी संकुलच्या गाळेभाड्यांचा प्रश्‍न सोडल्यास ती रक्कम मोठ्या प्रमाणात जमा होणार आहे.

jalgaon municipal corporation news
Jalgaon Market Committee Election : 11 जागांवर शिंदे गट, 7 जागांवर ‘भाजप’ लढणार

त्यामुळे आजच्या परिस्थितीत जळगाव महापालिकेची आर्थिक स्थितीत भक्कम आहे. आता महापालिकेच्या निधीचे अद्यापही नियोजन होत नसल्याचे दिसत आहे. आता या निधीतून शहरातील विविध भागांतील विकासकामांचे नियोजन करणे गरजेचे आहे. आयुक्तांनी या निधीचे नियोजन करणे गरजेचे आहे. त्यामुळे जळगावकरांचे खऱ्या अर्थाने प्रश्‍न सुटणार आहेत.

"महापालिका आता पूर्ण कर्जमुक्त झाली आहे. शासनाकडून महापालिकेला दरमहा मिळणारा निधी, विविध करांच्या माध्यमातून येणाऱ्या रकमेमुळे आर्थिक सक्षम आहे. महापालिकेने आता आपल्या निधीतून शहराच्या विविध भागांतील कामांचे नियोजन केले पाहिजे. आयुक्तांनी आता त्याकडे लक्ष द्यावे." -विशाल त्रिपाठी, नगरसेवक, जळगाव

jalgaon municipal corporation news
Jalgaon News : आरटीओने जप्त केलेल्या वाहनांचा लिलाव; विभागाने मागविल्या हरकती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.