Dr Ambedkar Statue : डॉ. आंबेडकर पुतळ्याची जागा मनपाने ताब्यात घ्यावी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Dr Babasaheb Ambedkar
Dr Babasaheb AmbedkarEsakal
Updated on

जळगाव : नवीन बी. जे. मार्केटसमोरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची जागा ताब्यात घेण्यासाठी महापालिका कार्यवाही करेल. पुतळा हटविणाऱ्या संशयितांना लवकरच अटक केली जाईल. (Municipalities should take over place of Dr Ambedkar statue Orders of Collector jalgaon news)

पुतळ्याच्या जागेबाबत माहिती मिळण्यासाठी समाजबांधवांपेकी चौघांची समिती गठीत करू, असे आश्‍वासन जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी समाजबांधवांना मंगळवारी (ता. २८) दिले.

डॉ. आंबेडकर पुतळा हटविण्याच्या घटनेला १५ दिवस उलटत आले, तरी अद्यापही संशयित मोकाटच आहेत, त्यांना त्वरित अटक करावी, पोलिसांनी मध्यरात्रीनंतर पुतळा हटविलाच कसा? वास्तविक पुतळा ज्या जागेवर आहे, त्या जागेची विक्री झाली आहे.

मात्र, त्यावर जुन्याच मालकाचे नाव आहे, नवीन मालकाचे नाव सातबारा उताऱ्यावर नसताना पुतळ्या हटविलाच कसा, असे एक ना अनेक प्रश्‍न समाजबांधवांनी जिल्हाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत उपस्थित केले.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

Dr Babasaheb Ambedkar
Anandacha Shidha : आनंदाचा शिधा रेशनवर उपलब्ध! आमदार सुरेश भोळे यांच्या हस्ते वितरण

आमदार सुरेश भोळे, आयुक्त डॉ. विद्या गायकवाड, पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, ॲड. राजेश झाल्टे, ॲड. धनंजय ठोके, मुकुंद सपकाळे, सचिन धांडे, जगन सोनवणे, जळगाव शहर बौद्ध पंचायत संचलित बौद्ध वसाहत सेवा संघातर्फे घनश्‍याम सोनवणे, विजय निकम, राजू सपकाळे, आनंदा सोनवणे, भिका भालेराव व समाजबांधव उपस्थित होते. समाजबांधवांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. पोलिस संशयितांना का अटक करीत नाहीत, असा प्रश्‍नही समाजबांधवांनी उपस्थित केला.

जिल्हाधिकारी मित्तल यांनी त्यावर उत्तरे दिली. ती जागा महापालिकेला ताब्यात घेण्यासाठी कार्यवाही करण्याची सूचना केली. संशयितांवर गुन्हा सिद्ध झाला, तर त्यांच्यावर कारवाई होईलच. त्यांच्या अटकेसाठी पोलिस प्रयत्न करीत आहेत. हा प्रश्‍न सामाजिक असल्याने सर्वांनी शांततेत मार्ग काढू, चार जणांची एक समिती स्थापन करण्याबाबत आश्‍वासित केले.

अनिल अडकमोल यांचा निषेध

आरपीआयचे (आठवले गट) पदाधिकारी अनिल अडकमोल यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा हटविण्यात मोठी भूमिका बजावली, असा आरोप करीत त्यांचा समाजबांधवांनी या वेळी निषेध केला. समाजाने अडकमोल यांच्याशी संबंध न ठेवण्याचे आवाहन पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात झालेलया समाजबांधवांच्या बैठकीत केले.

Dr Babasaheb Ambedkar
Jalgaon News : विमा प्रीमियमची रक्कम ग. स. संस्थेकडून अदा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.