Jalgaon Municipality Election : महापालिका नगरसेवकांचा पाच वर्षांचा कार्यकाळ १७ सप्टेंबरला पूर्ण होत आहे. मात्र, नवीन निवडणूक घेण्याबाबत अद्याप कोणतीही प्रक्रिया सुरू झालेली नाही.
दर पाच वर्षांनी प्रथम महापालिकेची निवडणूक होते. त्यानंतर लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक होते. जळगाव महापालिकेच्या निवडणुकीत उत्तर महाराष्ट्राचे राजकीय वातावरण ढवळून निघते. (municipality election term of corporators will end on September 17 jalgaon news)
त्यामुळे राजकीय पक्षांच्या दृष्टीनेही या निवडणुकीचे मोठे महत्त्व आहे. महापालिकेत विजयी होणाऱ्या पक्षामुळे राजकीय वातावरणाचा नागरिकांचा कल दिसून येतो. त्या आधारवर पक्ष व इच्छुकही तयारी करतात.
१ ऑगस्ट २०१८ ला महापालिकेची निवडणूक झाली होती. ३ ऑगस्ट २०१८ ला निकाल जाहीर झाला होता. महापौर निवडीची पहिली सभा १८ सप्टेंबरला झाली होती. त्या सभेपासून पुढील पाच वर्षांची गणना होते. त्यामुळे १७ सप्टेंबर २०२३ ला विद्यमान नगरसेवकांचा पाच वर्षांचा कालावधी पूर्ण होणार आहे. आता नगसेवकांचा कालावधी अडीच महिन्यांचा राहिला आहे.
नवीन निवडणूक प्रक्रियाच नाही
नगरसेवकांची कार्यकाळ पूर्ण होत असल्याने नवीन निवडणुकांची नागरिकांनाही प्रतिक्षा आहे. नवीन निवडणुकीसाठी लोकसंख्येच्या आधारावर नवीन प्रभाग रचना करण्याची प्रक्रिया साधारणत: सहा ते सात महिने अगोदरच सुरू होते. मात्र, यंदा त्याबाबत कोणतेही आदेश नाहीत.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
महापालिका निवडणूक पुढे ढकलल्यास प्रशासकीय राजवट लागू होण्याची शक्यता आहे. नाशिक, मुंबई, पुणे, पिंपरी- चिंचवड येथील महापालिकांची मुदत संपली आहे. त्यांच्याही निवडणुका न झाल्यामुळे त्या ठिकाणी प्रशासकीय राजवट आहे. जळगाव महापालिकेची निवडणूक पुढे ढकलल्यास १७ सप्टेंबरपासून महापालिकेत आयुक्तांची प्रशासकीय राजवट लागू होईल. निवडणूक होईपर्यंत आयुक्तच कारभार पाहतील, अशी शक्यता आहे.
लोकसभेनंतरच निवडणूक
२०२४ मध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. महापालिकेची निवडणूक लोकसभा झाल्यानंतरही होण्याची शक्यता आहे. शासनाने चार नगरसेवकांचा एक प्रभाग कायम ठेवला आहे. त्यानुसार ७५ प्रभागांची रचना कायम ठेवण्याचा निर्णय घेऊन निवडणूक झाल्यास लोकसभेअगोदर निवडणूक होऊ शकेल, अन्यथा लोकसभेनंतरच मनपा निवडणूक होण्याची शक्यता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.