Jalgaon Politics : नेते मोठे झाले, जळगाव नेतृत्वहीन... चूक नागरिकांची की?

Gulabrao Patil, Eknath Khadase and Girish Mahajan
Gulabrao Patil, Eknath Khadase and Girish Mahajan google
Updated on

"जळगाव खानदेशातील महत्त्वाचे शहर. जळगावचा विकास झाला, तर तो संपूर्ण खानदेशचा विकास, असे म्हटले जाते होते. आज मात्र परिस्थिती बदलली आहे. खानदेशातील धुळे, नंदुरबार, शिरपूर ही शहरे आज विकासाच्या दृष्टीने पुढे जात आहेत.

जळगाव मात्र मागे पडले आहे. अगदी रस्त्यांच्या मूलभूत सुविधाही या ठिकाणी मिळणे कठीण झाले आहे. याच जळगावने सुरेशदादा जैन, एकनाथराव खडसे, गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटील यांना मोठे नेते केले.

मात्र, राजकारणातील उलथापालथीचा दोष जळगावकरांना देत त्यांच्यावर नाराजी दाखवत नेत्यांनी जळगावकरांना वाऱ्यावर सोडले आहे. आज महापालिका भक्कम नेत्याअभावी नेतृत्वहीन झाली आहे. नागरिकांच्या समस्या ऐकणारे कोणीही नाही.

नागरिकांनी या नेत्यांवर वेळोवेळी प्रेम केले, त्यांना साथ दिली. मात्र, आज त्यांनीच शहराला वाऱ्यावर सोडले आहे. मात्र, ज्यांनी वेळोवेळी प्रेम केले, त्यांच्यावरच नाराजी व्यक्त होत असेल तर दोष कुणाचा, याचे उत्तर जनतेने नव्हे; तर नेत्यांनीच द्यायचे आहे." -कैलास शिंदे, जळगाव

(municipality has become leaderless due to lack of strong leader in jalgaon news)

शहरात चांगले रस्ते असावेत, पाणीपुरवठ्याची चांगली सुविधा व स्वच्छता असावी, मोठ्या बाजारपेठा असाव्यात, मोठे उद्योग यावेत, तसेच चांगले उद्याने असावेत, असे प्रत्येक नागरिकाला वाटते.

राजकारणात वर्चस्व असलेल्या नेत्यांच्या माध्यमातून आपल्या शहराचा विकास होईल, याचा विश्‍वास असल्यामुळे जनता नेत्याच्या मागे जाते. जळगावकरांनीही याच आशेने नेत्यांना आपलेसे केले. नेत्यांनीही जळगावकरांच्या विश्‍वास सार्थ ठरविण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही वेळा त्यांना यश आले. काही वेळा नाही आले. मात्र, आज सर्वच नेत्यांनी पाठ फिरविल्याचे दिसत आहे.

सुरेशदांदाना सत्ता, पण आता

सुरेशदादा जैन यांनी १९८४ मध्ये राजकारणात प्रवेश केला. त्यावेळी एक धाडसी नेतृत्व म्हणून जळगावकरांनी त्यांच्यावर विश्‍वास व्यक्त केला. त्यांना आमदार म्हणून निवडून दिले. त्यानंतर जळगाव शहराच्या विकासाच्या दृष्टीने नगरपालिकाही त्यांच्या ताब्यात दिली. एक-दोन वर्षे नव्हे, तर तब्बल ३५ वर्षे पालिकेत त्यांच्या नेतृत्वाखाली सत्ता होती.

हेही वाचा : शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?

Gulabrao Patil, Eknath Khadase and Girish Mahajan
Jalgaon News : चाळीसगावच्या पाचपाटलांचा ‘युनो’त डंका! उपअभियंता पायगव्हाणेंचे सादरीकरण

आताही सुरेशदादा जैन यांच्याच नेतृत्वाच्या छत्रछायेत निवडून आलेले सत्ताधारी आहेत. आमदार म्हणून जळगावकरांनी एक पंचवार्षिक नव्हे, तर तब्बल नऊ वेळा निवडून दिले. एवढे मोठे प्रेम कोणत्याही नेत्याला जळगावकरांनी दिले नाही. केवळ एका निवडणुकीत ते पराभूत झाले. सध्या तरी ते राजकारणातून अलिप्त आहेत.

जळगावच्या समस्येवरही बोलत नाही. जळगावकर मात्र आजही त्यांच्याकडे आशेने पाहत आहेत. सुरेशदादा यांच्या राजकीय स्थित्यंतराबाबत जळगावातील जनतेला दोष कसा देता येईल, याचा विचार करण्याची गरज आहे. ज्या जनतेने सलग नऊ वेळा निवडून दिले. महापालिकेत ३५ वर्षे सत्ता दिली. त्यांच्याबाबत विचार होऊ नये हे मात्र आजही जनतेच्या मनाला पटत नाही. राजकारणात जय-पराजय असतोच. मात्र, त्यामुळे जनतेला सोडून देणे हा प्रश्‍नांकित मुद्दा होऊ शकतो.

खडसेंचा नगराध्यक्ष केला, पण...

एकनाथ खडसे यांच्यावरही जळगावकरांनी प्रेम केले. श्री. खडसे यांचे आक्रमक नेतृत्व लक्षात घेऊन महापालिकेत २००२ मध्ये थेट नगराध्यक्षपदाचा उमेदवार भाजपचा निवडून दिला. सोबत नगरसेवकांचे बलाबलही दिले. कालांतराने पालिकेची महापालिका झाली. भाजपची सत्ता गेली. त्यानंतर भाजप महापालिकेत कायम राहिली.

Gulabrao Patil, Eknath Khadase and Girish Mahajan
Market Committee Election : वर्चस्वासाठी BJPचे जोरदार प्रयत्न; NCPची सत्ता राखण्यासाठी उमेदवारांची चाचपणी

शहरात सुरेश (राजूमामा) भोळे भाजपचे आमदार झाले. मात्र, पुढे श्री. खडसे यांच्या नेतृत्वापासूनही जळगावकर वंचित झाले. आज श्री. खडसे पुन्हा आमदार झाले. त्यांनी शहरातील काही रस्त्यांच्या कामांबाबत आवाज उठविला. मात्र, तेवढे पुरेसे नाही. त्यांनी आपला आक्रमकपणा दाखवत पुन्हा एकदा जळगावकरांच्या सोबत येण्याची गरज आहे.

महाजनांना ५७ नगरसेवकांचे बळ दिले, पण...

जळगावकरांनी भाजपचे नेते, आमदार गिरीश महाजन यांच्यावर विश्‍वास ठेवला. जळगावचे पालकमंत्री असताना, २०१८ च्या निवडणुकीत जळगावकरांनी तब्बल ५७ नगरसेवकांचे बळ भाजपच्या पारड्यात टाकले. भाजपचा महापौर आणि उपमहापौर झाला. दुर्दैवाने राज्यातील भाजपची सत्ता गेली.

त्यानंतर त्यांनी जळगावकडे दुर्लक्ष केले. विशेष म्हणजे तब्बल ३६ नगरसेवक फुटून पक्षातून बाहेर पडले. त्यावेळी त्यांनी त्यांना रोखण्याबाबत फारसे प्रयत्न केले नाहीत. त्यामुळे महापालिकेतील भाजपची सत्ता गेली. त्यानंतर महाजनांनीही महापालिकेकडे फारसे लक्ष दिले नाही. जनतेने निवडून दिलेले नगरसेवक भाजपला सांभाळता आले नाहीत.

Gulabrao Patil, Eknath Khadase and Girish Mahajan
SAKAL Exclusive : नोटीस बजावूनही NMCला ठेंगा! सर्वसामान्यांवर कारवाई, शासकीय कार्यालयांची दिरंगाई

त्यात जनतेची काय चूक? याचाही विचार करण्याची गरज आहे. आज पुन्हा राज्यात भाजपची सत्ता आहे. महापालिकेत भाजपची सत्ता नाही. महाजनांकडे जळगावचे पालकमंत्रिपद नाही, तरीही राज्यातील राजकारणात त्याचा वकुब आहे. आताही त्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.

गुलाबरावांकडे दुसऱ्यांदा पालकमंत्रिपद

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा तसा जळगाव महापालिकेच्या राजकारणाशी संबंध आलेला नाही. मात्र महाविकास आघाडी असताना, महापालिकेत सत्तातंर झाले. भाजपची सत्ता खालसा करून शिवसेनेची सत्ता स्थापन झाली. त्यावेळी नगरसेवकांना सोबत नेण्यात त्यांचा वाटा होता, असे म्हणतात.

कालातंराने राज्यात शिवसेना फुटली. तेही बाहेर पडले. त्यांना जळगावचे पालकमंत्रिपद मिळाले. त्यामुळे महापालिकेत त्यांच्या गटाची सत्ता नसली तरी जळगावचे पालकमंत्री, म्हणून महापालिकेच्या विकासाची जाबाबदारी त्यांच्यावर आहे.

जिल्ह्यात शिवसेनेचे (शिंदे गट) नेतृत्व त्यांच्याकडे आहे. त्यामुळे महापालिकेत सत्ता विसरून राज्यातील सरकार आणि जिल्ह्याचे पालकत्व, म्हणून जळगावकरांच्या समस्येकडे लक्ष देणे गरजेचे आहे. कारण जनताही त्यांच्याकडे सरकार म्हणूनच पाहत आहे.

Gulabrao Patil, Eknath Khadase and Girish Mahajan
Jalgaon News : 'अल निनो'वर पावसाचे भवितव्य अवलंबून; जाणून घ्या काय आहे अल निनो..

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()