Jalgaon News : गोवर आजाराबाबत महापालिका Alert मोडवर

Jalgaon: Speaking at the meeting regarding measles in Municipal Corporation on Thursday, Dr. Prakash Nandapurkar. Neighbor Dr. Ram Rawlani, Sunil Gorane and Asha Swayamsevika.
Jalgaon: Speaking at the meeting regarding measles in Municipal Corporation on Thursday, Dr. Prakash Nandapurkar. Neighbor Dr. Ram Rawlani, Sunil Gorane and Asha Swayamsevika.esakal
Updated on

जळगाव : शहरात गोवरचे रुग्ण आढळल्याने महापालिकेचा दवाखाना विभाग अलर्ट झाला आहे. आशा स्वयंसेविका, सामाजिक संस्थेच्या माध्यमातून शहरातील विविध भागांत जनजागृती करण्यात येणार आहे. महापालिकेत गुरुवारी (ता. १) जागतिक आरोग्य संघटनेचे डॉ. प्रकाश नंदापुरकर, महापालिकेचे सहाय्यक आयुक्त सुनील गोराणे, वैद्यकीय अधिकारी डॉ. राम रावलाणी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

महापालिकेच्या दुसऱ्या मजल्यावरील सभागृहात झालेल्या बैठकीत शहरातील गोवरच्या रुग्णांचा आढावा घेण्यात आला. शहरातील विविध भागांत गोवर आजारापासून बाधित असलेल्या रुग्णांची तपासणी सुरू आहे. या भागात रुग्णसंख्या वाढू नये, यासाठी महापालिकेने आधीच शहरातील स्लम भागात तपासणी सुरू केली आहे.

या आजाराची लक्षण दिसताच नागरिकांनी न घाबरता वैद्यकीय सल्ला घ्यावा, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. या सर्व कामात महापालिका आपल्यासोबत असल्याचे सांगण्यात आले.(Municipality on alert mode regarding measles disease Jalgaon News)

हेही वाचा : आरामात फेडू शकाल अशीच घ्या कर्जे....

Jalgaon: Speaking at the meeting regarding measles in Municipal Corporation on Thursday, Dr. Prakash Nandapurkar. Neighbor Dr. Ram Rawlani, Sunil Gorane and Asha Swayamsevika.
Online Gambling: सट्टा व्यावसायिकांचे टार्गेट शाळकरी विद्यार्थी; तुमची मुलं रोलेट फनच्या कचाट्यात तर नाही ना..?

शहरातील जमुनानगर, चंदूअण्णानगर, जोशी कॉलनी, शनिपेठ, तांबापुरा, समतानगर या भागांत गोवरचे रुग्ण आढळल्याचे सांगण्यात आले. या परिसरात घरोघरी आशा सेविकांमार्फत तपासणी सुरू करण्यात आल्याची माहिती देण्यात आली, तसेच जनजागृती करण्यासाठी सामाजिक संस्था व या भागात काम करणाऱ्या वेगवेगळ्या संस्थांची संयुक्तीक बैठक घेण्यात आली.

यात ज्या भागात गोवरच्या लस घेण्यास नकार दिला जातो. त्याच भागात रुग्ण आढळत असल्याचेही सांगण्यात आले. यासाठी त्या भागातील नगरसेवक, धर्मगुरू, प्रतिष्ठित नागरिकांच्या सहकार्याने लसीकरण करण्यात येणार असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. गोवरपासून ८ वर्षांखालील बालकांचे संरक्षण करायचे आहे. त्यांना कोणतीही लक्षणे दिसताच जवळच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला घ्यावायचा आहे, असे आवाहनही करण्यात आले.

ताप येणे, पुरळ येणे, खोकला, डोळे लाल होणे, नाकातून पाणी येणे ही लक्षणे दिसताच नजीकच्या महापालिकेच्या रुग्णालयात जाऊन डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार करावेत, असेही अवाहन करण्यात आले.

Jalgaon: Speaking at the meeting regarding measles in Municipal Corporation on Thursday, Dr. Prakash Nandapurkar. Neighbor Dr. Ram Rawlani, Sunil Gorane and Asha Swayamsevika.
माणुसकीचा संदेश देणारे ‘अशुद्ध बीजापोटी’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.