पाचोरा (जि. जळगाव) : येथील पालिकेच्या वतीने घरपट्टी, पाणीपट्टी, जागा व गाळेभाडे वसुलीची धडक मोहीम सुरूच असून, मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांच्यासह पालिका कर्मचाऱ्यांचे पथक ढोल ताशे वाजवत व्यापारी संकुल व दुकानांमध्ये जाऊन वसुली करीत असल्याने या प्रकाराकडे शहरवासीयांचे लक्ष वेधले गेले आहे. (municipalitys aggressive recovery campaign sealed seventeen lumps in Pachora jalgaon news)
या धडक मोहिमेत शहरातील शिवाजीनगर भागातील शॉपिंग सेंटर तसेच भडगाव रोड भागातील जलकुंभाजवळचे संकुल व कमल प्लाझातील १७ व्यापारी गाळे सील करण्यात आले आहेत. तसेच थकित मालमत्ताधारकांच्या घरासमोर ढोल वाजवून वसुली केली जात आहे. नळ कनेक्शन बंद करण्यात येत आहे. थकीत करांचा भरणा करण्याबाबत सहकार्य करून कटू प्रसंग टाळण्याचे आवाहन प्रशासक शोभा बाविस्कर यांनी केले आहे.
या धडक मोहिमेत शोभा बाविस्कर, दगडू मराठे, प्रकाश भोसले, साईदास जाधव, मधुकर सूर्यवंशी, संजय बाणाईते, दत्तात्रय जाधव, नितीन लोखंडे, भिकन गायकवाड, विशाल मराठे, गोपाल लोहार, किशोर मराठ, नरेश आदिवाल, युसूफ अजीज खान, फिरोज पठाण, संदीप खैरनार, विलास कुंभार, भिकन गायकवाड, विलास कुलकर्णी, दत्तात्रय पाटील, अनिल वाघ, आबा पाटील या पालिका अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!
थकबाकीदारांच्या घरासमोर बडविला ढोल
पाचोरा पालिकेच्या विविध करवसुलीसाठी प्रशासक शोभा बाविस्कर यांच्यासह पालिकेचे वसुली पथक ॲक्शन मोडवर आले असून, थकबाकीदारांची घरे व दुकानांसमोर ढोल-ताशे वाजवत पालिकेने वसुली सुरू केली आहे.
दरम्यान, २० मार्चला एकोणीस गाळे तर शुक्रवारी १७ गाळे सील करण्यात आले. यामुळे थकबाकीदारांचे धाबे दणाणले आहे. जागा व गाळाभाडे थकबाकीधारकांनी थकित कर व भाडे त्वरित भरावे व कटू प्रसंग टाळण्याचे आवाहन प्रशासक शोभा बाविस्कर यांनी केले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.