Jalgaon Crime News : पत्नीचा खून; पतीला जन्मठेप

Crime News
Crime Newsesakal
Updated on

Jalgaon News : खर्दे (ता. धरणगाव) येथील पत्नीचे हत्येनंतर साप चावल्याचा बनाव करणाऱ्या पतीला जिल्‍हा न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.

घटनेचा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नसतानाही सरकारी अभियोक्तांनी परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे मांडलेला युक्तिवाद आणि वैद्यकीय अहवालाच्या आधारे संशयित पती नामदेव रामा जाधव याच्याविरुद्ध गुन्हा सिद्ध झाला.(Murder of wife Life imprisonment for husband Proving crime by circumstantial evidence in absence of eyewitness Jalgaon Crime)

खर्दे येथे ३० डिसेंबर २०२१ ला नामदेव जाधव याचे पत्नी विठाबाईसोबत कोळशाच्या भट्टीसाठी गवत आणण्यावरून वाद झाला. विठाबाई यांनी पतीला शिवीगाळ केली. त्याचा राग येऊन नामदेव याने जवळ पडलेल्या लाकडी दांडक्याने विठाबाईस मारहाण केली. तिचे तोंड बंद होईना, म्हणून तिला जमिनीवर खाली पाडून मातीत तोंड खूपसून मरेस्तव मारहाण केली.

साप चावल्याचा बनाव

पत्नी विठाबाई मेल्यानंतर तिला उचलून नामदेव याने साप चावल्याचा बनाव केला. विठाबाईला जळगाव जिल्‍हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. डॉ. नीलेश देवराज यांनी शवविच्छेदन अहवालात मृत महिलेचा चेहरा व अंगावर तब्बल १७ जखमा होत्या, तसेच तोंडात माती आढळून आली.

मृत महिलेला बोथट हत्याराने मारहाण केली. जीव गुदमरून तिचा मृत्यू झाल्याचे म्हटले होते. पोलिस उपनिरीक्षक अमोल गुंजाळ यांच्या फिर्यादीवरून धरणगाव पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी नामदेव जाधव याला अटक केली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Crime News
Mumbai Crime : अल्पवयीन मुलीचा अश्लील Video बनवून नातेवाईकांना पाठवला; तरूणाविरोधात गुन्हा

दोषारेाप सिद्ध

जिल्‍हा व सत्र न्यायालयात न्यायाधीश एस. एस. सापतनेकर यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी झाली. सरकारी अभियोक्ता ॲड. सुनीलकुमार चोरडीया यांनी शवविच्छेदन करणारे डॉ. नीलेश देवराज, गुन्ह्याचे तपासाधिकारी सहाय्यक निरीक्षक गणेश अहिरे, संशयित नामदेव याने बाळू रामदास चव्हाण याच्याकडे दिलेल्या कबुलीनुसार त्याचा जबाव, अशा नऊ साक्षीदारांच्या साक्षी, वैद्यकीय अहवाल, न्यायवैद्यक शास्त्राचा अहवाल, अशा पुराव्यांच्या आधारावर संशयित नामदेव जाधव याच्याविरुद्ध गुन्हा सिद्ध झाला. न्यायाधीश सापतनेकर यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.

Crime News
Crime News : बेकायदेशीर दारूची वाहतूक करणाऱ्या कंटेनरवर कारवाई; 85 लाखांची बनावट दारू जप्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.