Kirankumar Bakale News : बकालेंमुळे माझा नवरा झाला दरोडेखोर झाला...

Jalgaon: Tim's face shows complete recovery and satisfaction as the crime is uncovered.
Jalgaon: Tim's face shows complete recovery and satisfaction as the crime is uncovered.esakal
Updated on

Jalgaon News : रायगड पोलिस दलात कार्यरत व सद्या आजारपणाच्या रजेवर राहून गैरहजर असलेला उपनिरीक्षक शंकर रमेश जासक याला स्टेट बँक दरोड्यात जळगाव पोलिसांनी अटक केली आहे.

त्याला अटक झाल्यावर त्याच्या पत्नीने तत्कालीन गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या नावाने बोटं मोडत लाखोली वाहिल्यावर तपास पथकाच्याही भुवया उंचावल्या. (My husband became a robber because of Bakale Sub Inspector Shankar jasak blame on bakale Jalgaon News)

असा झाला निलंबित

रायगड जिल्ह्यात कार्यरत पोलिस उपनिरीक्षक शंकर रमेश जासक हा महाड पोलिस ठाण्यात कार्यरत असताना लाचलुचपत विभागात कार्यरत किरणकुमार बकाले यांनी त्याला एक काम करून देण्यास सांगितले होते.

ते, काम त्याने केले नाही. परिणामी त्याचा वचपा काढण्यासाठी त्याच्याकडे तपासावर असलेल्या एका गुन्ह्याचे दोषारोप पत्र सादर झाले असताना बळजबरी खुशाली म्हणून शंकर जासकला फोनवर पैशांचे आमिष देण्यात आले, त्याने पाठवून दे सांगितल्याने लाचलूचपतचा छापा पडून तो त्यात डिसेंबर-२०१८ मध्ये निलंबित झाला होता.

दोन वर्षांनंतर २०२० मध्ये त्याला पुन्हा सामावून घेण्यात आले. काही महिने काम केल्यावर शंकर जासक हा वैद्यकीय रजेवर सुटला होता. तेव्हा पासून एकवर्ष उलटले तर, अद्यापही हजर झाला नाही. बकालेंनीच माझे कुटुंब उध्वस्त केले असा आरोप अटकेतील शंकर जासक याच्या पत्नीने केला आहे. या सर्व घटनाक्रमाला तपास पथकातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दुजोरा दिला आहे.

Jalgaon: Tim's face shows complete recovery and satisfaction as the crime is uncovered.
Jalgaon Crime News : स्विमींगचे दुसरेच कपडे देवून वॉटरपार्क कर्मचाऱ्यांना मारहाण

कर्जबाजारी अन्‌ पैशांची हौस

उपनिरीक्षक शंकर जासक हा रायगड जिल्ह्यात कर्जत येथे वास्तव्यास असून त्याच्या आलिशान फ्लॅटचे हप्ते सुरु आहेत. दोन अडीच वर्षांचे निलंबन, त्यानंतर एक वर्षापासून आजारपणाची रजा...पैशांची चणचण आणि कर्जबाजारी झाल्याने ‘झटपट’ आर्थिक विवंचनेतून बाहेर पडण्यासाठी त्याचा शालक काम करत असलेल्या स्टेट बँकेची माहिती त्याने घेतली.

शालकाने कॅशरुम बाबत आणि असणाऱ्या एकूण रोकड सोन्याची माहिती त्याला दिल्याने दरोड्याचा प्लॅन त्याने आखला एका झटक्यात पैसाच पैसा येईल या उद्देशाने त्याने पित्याच्या सोबत हा दरोडा टाकला.

गुन्ह्यात सहभागी उपनिरीक्षक जासक याला खात्यातून कायमचे बडतर्फ करण्याचा आदेश पोलिस महासंचालकांना बजावले असून तपास पथकाला बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Jalgaon: Tim's face shows complete recovery and satisfaction as the crime is uncovered.
Accident News: ह्रदय हेलवणारी घटना! वडिलांचे पार्थिव गावाकडे घेवून जाताना मुलाचा दुर्दैवी मृत्यू

जगा वेगळा बाप..

पोलिस दलात अधिकारी असलेल्या मुलाचा पिता रमेश जासक (वय ६७) हा स्वतः दरोडा टाकण्यासाठी मुलासोबत स्टेट बँकेत आला होता. एखादा पिता आपल्या मुलास वाईट कृत्य करण्यापासून रोखले मात्र, इथे रमेश जासकने या दरेाड्यात सक्रिय सहभाग घेत मुलास गुन्ह्यात मदत केल्याचे आगळेवेगळे उदाहरण समोर आले आहे.

बँकेचा हलगर्जीपणा नडला

स्टेट बँकेच्या धोरणानुसार २० लाख रुपयांपेक्षा अधिकचे दिवसाचे व्यवहार असल्यास सशस्त्र सुरक्षा पुरवली जाते. मात्र, कालिंका माता मंदिर चौकातील या शाखेत रोकडचा व्यवहार जरी वीस लाखाच्या जवळपास असला तरी, सोने तारण ठेवण्याचे प्रमाण मोठ्याप्रमाणावर होते. त्यात बँक प्रशासनाने हलगर्जी केल्यामुळेच हा दरोडा यशस्वी झाला असून या बाबत खबरदारी घेण्याच्या लेखी सूचना बँकांना करण्यात आल्याची माहिती जिल्‍हा पोलिस अधीक्षक एम राजकुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मॅनेजरचे शौर्य

बँकेचे मॅनेजर राहुल महाजन यांनी या दोन्ही दरोडेखोरांचा दोन तीन वेळेस मजबूत प्रतिकार केला. दोघांमध्ये झटापटही झाली. मांडीत चॉपर खुपसून जखमी असतानाही त्यांचा प्रयत्न जिकरीचा होता, असा उल्लेख अधीक्षक एम.राजकुमार यांनी केला.

Jalgaon: Tim's face shows complete recovery and satisfaction as the crime is uncovered.
Accident News: ह्रदय हेलवणारी घटना! वडिलांचे पार्थिव गावाकडे घेवून जाताना मुलाचा दुर्दैवी मृत्यू

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()