जळगाव : शेगाव संत श्री गजानन महाराजांचे पवित्र स्थान आहे. देशभरातील अनेक भाविक शेगावला दर्शनाला येतात.
यामुळे चार रेल्वे एक्सप्रेस गाड्ड्यांना शेगाव, जलंब रेल्वेस्थानकावर थांबा (Halt) देण्यात आला आहे. येत्या मंगळवार (ता. २८)पासून या गाड्या वरील स्थानकावर थांबतील. (Nagpur Pune Nanded Express will now stop at Shegaon jalgaon news)
२२१४१ व २२१४२ नागपूर-पुणे-नागपूर एक्सप्रेस शेगाव रेल्वेस्थानकावर ३१ मार्चपासून थांबेल. १२४२१ व १२४२२ नांदेड-अमृतसर-नांदेड एक्सप्रेस शेगाव स्थानकावर २८ मार्चपासून, १२७५१ व १२७५२ नांदेड जम्मूतावी नांदेड एक्सप्रेस शेगाव स्थानकावर २७ मार्चपासून, ११०३९ व ११०४० कोल्हापूर- गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस जलंब रेल्वेस्थानकावर २७ मार्चपासून थांबेल, असे रेल्वे प्रशासनाच्या सूत्रांनी सांगितले.
सुरत पाळधी मेमू जळगावपर्यंत केव्हा येणार?
पशिच्म रेल्वेने सुरत ते पाळधीदरम्यान मेमू गाडी सुरू केली आहे. ती गाडी जळगाव रेल्वेस्थानकापर्यंत न्यावी, अशी मागणी अनेक प्रवाशांची आहे. नंदुरबार, अमळनेरसह अनेक स्थानकावरून प्रवासी जळगाव, भुसावळला नोकरीनिमित्त येतात. मात्र, ही गाडी केवळ पाळधी स्थानकापर्यंत असल्याने अनेकांना ती गैरसोयीची आहे.
हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!
ती जळगावपर्यंत आणल्यास ग्रामीण भागातील नागरिकांना जळगावपर्यंत येता येईल. जळगाव स्थानकापर्यंत ही गाडी नेण्याची मागणी रेल्वे बोर्डाकडे भुसावळ रेल्वे कार्यालयाने केली आहे. मात्र, तिला अद्याप यश आलेले नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.