यावल : किनगाव येथे सोमवारी (ता. २२) बालविवाह होत असल्याची तक्रार प्राप्त झाल्यावरून यावल येथील एकात्मिक महिला व बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांसह पोलिसांचे पथक त्या ठिकाणी दाखल होत विवाह रोखला. वधूसह इतर मंडळींना थेट यावल पोलिस ठाण्यात आणत त्यांना समज देण्यात आली. (Kingaon administration prevented possible child marriage)
विवाह होत नव्हता, तर केवळ साखरपुडा करीत होतो, असे वधू-वर पक्षांनी सांगितल्याने पोलिसांनी समज देऊन सोडले आहे. किनगाव (ता. यावल) येथे सोमवारी एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह केला जात असल्याची माहिती एकात्मिक महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी अर्चना आटोळे यांच्याकडे प्राप्त झाली होती.
तेव्हा त्यांनी सदर माहिती खरी आहे का, याची पडताळणी करण्यासाठी थेट पथकासह किनगाव गाठले. किनगाव गावातील इचखेडा रस्त्यावर आदिवासी वस्तीवर बालविवाह सुरू होता. दरम्यान, त्यांनी त्या ठिकाणी पोलिसांना सोबत घेऊन दाखल होत हा बालविवाह रोखला आणि वधू आणि वधू पक्षाच्या लोकांना घेऊन त्यांनी थेट यावल पोलिस ठाणे गाठले. (latest marathi news)
यावल पोलिस ठाण्यात वधू-वर पक्षांची पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली चौकशी केली. चौकशीत त्यांनी सांगितले, की या ठिकाणी आम्ही विवाह करीत नव्हतो, तर साखरपुडा केला. वधू १८ वर्षांची होत नाही तोपर्यंत तुम्ही तिचा विवाह कायदेशीररीत्या करू शकत नाही आणि तसे केल्यास तुमच्याविरुद्ध फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल केला जाईल, अशी समज वधू-वर पक्षांना देण्यात आली.
तशी नोंद देखील पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. या संपूर्ण कारवाईसाठी यावल येथील एकात्मिक महिला व बालविकास अधिकारी अर्चना आटोळे, पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकूर, संदीप तायडे, हवालदार मोहसीन खान, अलाउद्दीन तडवी, संदीप साळवे यांनी परिश्रम घेतले व बालविवाह रोखण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.