जळगाव : विधानसभा निवडणुकीसाठी जळगाव तहसील कार्यालयात ११ मतदारसंघांचे मतदान होत आहे. तीन दिवसांत पोलिसांचे केवळ ८७० मतदान झाले. बहुतांश कर्मचाऱ्यांची नावे यादीत नसल्याने त्यांना मतदान करता आले नाही. अशा उमेदवारांना येत्या बुधवारी (ता. २०) मतदान करता येणार असल्याचे प्रशासनाने जाहीर केले. मात्र, त्यादिवशी ड्यूटी असल्याने या कर्मचाऱ्यांवर मतदानापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. मतदानाला दोन दिवस शिल्लक असून, सोमवारी (ता. १८) प्रचारतोफा थंडावतील.