Nashik Vidhan Sabha Election 2024: जिल्ह्यातील 7 मतदारसंघांवर काँग्रेसचा दावा! पंधरा मतदारसंघांतून 64 इच्छुकांनी दिल्या मुलाखती

Latest Political News : इगतपुरी आणि नाशिक मध्य मतदारसंघात डझनभरापेक्षा अधिक इच्छुकांनी उमेदवारीची मागणी केली आहे. जिल्ह्यातील १५ पैकी सात मतदारसंघांवर काँग्रेसचा दावा राहणार असल्याची माहिती श्री. पाटील यांनी दिली.
Kunal Patil while guiding the interview of an aspiring Congress candidate in Nashik district.
Kunal Patil while guiding the interview of an aspiring Congress candidate in Nashik district.esakal
Updated on

Nashik Vidhan Sabha Election 2024 : वर्ष २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत उमेदवाराची शोधाशोध करणाऱ्या काँग्रेसला लोकसभा निवडणुकीतील यशानंतर ‘अच्छे दिन’ आले आहेत. प्रत्येक मतदारसंघात उमेदवारीसाठी इच्छुकांची भाऊगर्दी झाली. शनिवारी (ता. ५) काँग्रेसचे कार्याध्यक्ष व नाशिकचे प्रभारी आमदार कुणाल पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या इच्छुकांच्या मुलाखतीत १५ जागांसाठी तब्बल ६४ इच्छुकांनी मुलाखती दिल्या आहेत.

विशेष म्हणजे काही महिन्यांपासून चर्चेत असलेले आमदार हिरामण खोसकर यांनीही मुलाखत दिली. इगतपुरी आणि नाशिक मध्य मतदारसंघात डझनभरापेक्षा अधिक इच्छुकांनी उमेदवारीची मागणी केली आहे. जिल्ह्यातील १५ पैकी सात मतदारसंघांवर काँग्रेसचा दावा राहणार असल्याची माहिती श्री. पाटील यांनी दिली. (Vidhan Sabha Election 2024 Congress claims 7 constituencies)

शनिवारी आमदार पाटील यांच्यासह खासदार डॉ. शोभा बच्छाव यांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. मुलाखतीनंतर पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, की प्रत्येक मतदारसंघात ३ ते १३ पर्यंत इच्छुकांची संख्या पाहायला मिळाली. जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदारसंघांसाठी जवळपास ६४ जणांनी मुलाखती दिल्या.

मुलाखतींचा अहवाल पक्षाध्यक्षांना सादर केला जाणार आहे. गत निवडणुकीत काँग्रेसने १५ पैकी सहा जागा लढविल्या होत्या; परंतु यंदा १५ पैकी सात जागा हव्या आहेत. याबाबतचा अंतिम निर्णय काँग्रेस पक्ष घेईल. महायुतीतील सहा ते सात बडे नेते हे काँग्रेसकडून उमेदवारीसाठी इच्छुक असून, त्यांनी आपल्या भेटी घेतल्याचा दावा पाटील यांनी या वेळी केला.

काँग्रेसकडे प्रत्येक मतदारसंघात इच्छुक असून, ज्याला उमेदवारी मिळेल, त्याचे काम करण्याची तयारी इच्छुकांनी दर्शवली आहे. तसेच, महाविकास आघाडीत ज्या पक्षाला जागा मिळेल, त्या पक्षाचे काम करण्याची इच्छुकांची तसेच कार्यकर्त्यांची तयारी असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी प्रदेश उपाध्यक्ष शरद आहेर, जिल्हाध्यक्ष शिरीष कोतवाल, शहराध्यक्ष ॲड. आकाश छाजेड आदी उपस्थित होते.

विधानसभानिहाय इच्छुक

इगतपुरी-त्र्यंबकेश्वर (१३), नांदगाव (२), दिंडोरी-पेठ (२), चांदवड-देवळा (५), बागलाण (७), मालेगाव मध्य (२), मालेगाव बाह्य (३), येवला (२), सिन्नर (३), कळवण-सुरगाणा (३), निफाड (२), नाशिक मध्य (१२), नाशिक पूर्व (४), नाशिक पश्चिम (२). (latest marathi news)

Kunal Patil while guiding the interview of an aspiring Congress candidate in Nashik district.
Dhule Vidhan Sabha Election 2024 : साक्री मतदारसंघ निवडणुकीपूर्वीच लक्षवेधी; भाजपच्या खेळीकडे सर्वांचेच लक्ष

इगतपुरी, मध्यमध्ये सर्वाधिक इच्छुक

नाशिक मध्य आणि इगतपुरी मतदारसंघात इच्छुकांच्या उमेदवारीसाठी उड्या पडल्याचे चित्र होते. इगतपुरीत विद्यमान आमदार हिरामण खोसकर यांच्यासह तब्बल १३ इच्छुकांनी मुलाखती दिल्या; तर नाशिक मध्य मतदारसंघात काँग्रेस प्रवक्त्या डॉ. हेमलता पाटील, माजी गटनेते शाहू खैरे, ‘मविप्र’चे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांच्यासह तब्बल १२ जणांनी मुलाखती दिल्या.

ॲड. ठाकरे यांनी पक्षात प्रवेश केला नसतानाही मुलाखत दिली. त्यानंतर बागलाणमध्ये सात, तर चांदवडमध्ये जिल्हाध्यक्ष कोतवाल यांच्यासह चार जणांनी मुलाखती दिल्या. माजी जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे यांनी नाशिक मध्य व पूर्वमधून उमेदवारी मागितली आहे.

दशरथ पाटील-कोतवाल यांच्यात तू-तू-मैं-मैं

माजी महापौर दशरथ पाटील हेही काँग्रेसच्या मुलाखतींना हजेरी लावण्यासाठी दाखल झाले असता ते आणि जिल्हाध्यक्ष कोतवाल यांच्यात तू-तू-मैं-मैं झाली. इगतपुरीच्या मुलाखती सुरू असतानाच पाटील यांनी आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला.

त्या वेळी कोतवाल यांनी त्यांना अडविले असता, पाटील यांनी त्यांचा एकेरी उल्लेख केला. त्यानंतर तुमचे-माझे वय सारखेच असल्याची पाटील यांनी कोतवाल यांना जाणीव करून दिल्याचे समजते. त्यानंतर पाटील निघून गेले. शहराच्या मुलाखतीवेळी पाटील पुन्हा मुलाखतीसाठी दाखल झाले.

Kunal Patil while guiding the interview of an aspiring Congress candidate in Nashik district.
Vidhan Sabha Election 2024 : नवं सूत्र अवलंबिताना चांदवडच्या भाजप बैठकीत खडाजंगी! उमेदवारी देताना लागणार वरिष्ठांचा कस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.