चाळीसगाव : राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये गेल्या तीन दिवसांत एकूण १४ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले असून, शुक्रवारी (ता. २३) नऊ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले.
शुक्रवारी माघार घेणाऱ्यांमध्ये ईश्वरसिंग राजपूत (ठाकरे), निळकंठ भोकरे यांचे प्रत्येकी दोन उमेदवारी अर्ज होते. त्याशिवाय मनोहर दामू सूर्यवंशी, सुनंदा गुलाबराव भोसले, सुवर्णसिंग प्रतापसिंग राजपूत, बाळासाहेब भाऊराव पाटील व धनराज बाबूराव पाटील यांचा समावेश आहे. सोमवारी (ता. २६) उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. (National Board of Education 14 applications left in election Last day on Monday Jalgaon News)
निवडणुकीत तीन पॅनल होणार हे स्पष्ट झाले आहे. तिसऱ्या पॅनलचे नेतृत्व संस्थेचे माजी सचिव डॉ. नरेश देशमुख, माजी संचालक अशोक खलाने, माजी नगरसेवक प्रशांत देशमुख, माजी संचालक व बाजार समितीचे सभापती ॲड. रोहिदास पाटील करीत आहेत.
गेल्या सात वर्षांपूर्वी संस्थेच्या झालेल्या निवडणुकीत डॉ. नरेश देशमुख व ॲड. रोहिदास पाटील हे दोनच उमेदवार मिळून निवडणूक लढविली होती. त्यांना मात्र त्यांचा पराभव झाला होता. यावेळी ते पुन्हा निवडणूक रिंगणात उतरले आहेत. संस्थेचे विद्यमान सचिव व कृषिभूषण अरुण निकम व त्यांचे सहकाऱ्यांचे एक पॅनल, तर माजी सचिव डॉ. विनायक चव्हाण यांचे एक पॅनल, असे दोन पॅनलचे उमेदवार गेल्या तीन आठवड्यापासून प्रचार करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.