National Lok Adalat: राष्ट्रीय लोकअदालतमध्ये 12 हजारांवर प्रकरणे; जिल्ह्यासह तालुक्यांच्या ठिकाणी आयोजन

National Peoples Court
National Peoples Courtesakal
Updated on

National People Court : जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा वकील संघातर्फे शनिवारी (ता.९) सकाळी साडेनऊला जिल्हा न्यायालय व सर्व तालुक्यांच्या ठिकाणी राष्ट्रीय लोकअदालत होईल.

त्यामध्ये १२ हजार ७८२ प्रलंबित आणि ३२ हजार ७९० वादपूर्व प्रकरणे ठेवण्यात येणार आहेत. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायाधीश एस. पी. सय्यद यांनी ही माहिती दिली. (National Lok Adalat 12 thousand cases will be kept jalgaon news)

जिल्‍हा व सत्र न्यायालयात बुधवारी (ता. ६) झालेल्या पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली. जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे एम. क्यू. एस. एम. शेख यांच्या अध्यक्षतेखाली लोकअदालतला सुरुवात होईल. जिल्हा वकील संघ अध्यक्ष, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिका आयुक्त उपस्थित राहतील.

मोटार वाहन ट्राफिक चलन, भूसंपादन धनादेश, वैवाहिक खटले, मोटार अपघात खटले, म्युन्सिपल अपील, दिवाणी व फौजदारी प्रकरणे, न्यायालयात प्रलंबित खटले व दाखल पूर्व प्रकरणे आणि एकूण ज्या खटल्यांमध्ये कायद्याने तडजोड करता येते, असे खटले तडजोडीने निकाली काढण्यासाठी ठेवण्यात येणार आहेत.

National Peoples Court
National People Court : लोकअदालतीत पावणेदोन कोटींची नुकसानभरपाई

औद्योगिक, कामगार, सहकार न्यायालय आणि ग्राहक तक्रार निवारण मंचामधील तडजोड योग्य प्रकरणे देखील त्या-त्या न्यायालयांमधील राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये असतील.

ऐनवेळी ज्या पक्षकारांना आपले खटले तडजोडीने निकाली काढण्यासाठी ठेवायचे असतील, त्यांना सुध्दा संधी देण्यात आली आहे. ऑनलाइन पद्धतीने पक्षकार लोकअदालतीमध्ये सहभागी होऊ शकतात. ई-मेलद्वारे प्रकरण लोकअदालतीमध्ये ठेवू शकणार आहेत, असेही सांगण्यात आले.

National Peoples Court
National Peoples Court: शनिवारी राष्ट्रीय लोकअदालतीचे नाशिकमध्ये आयोजन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.