Jalgaon Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवारांची 4 सप्टेंबरला जळगावात सभा

sharad pawar
sharad pawaresakal
Updated on

Jalgaon Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार पुढच्या महिन्यात जळगाव दौऱ्यावर येत आहेत. ४ सप्टेंबरला सागर पार्क येथे त्यांची जाहीर सभा होणार असल्याची माहिती आमदार एकनाथ खडसे यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.

बुधवारी (ता. १६) जळगाव येथील त्यांच्या निवासस्थानी नियोजनाबाबत बैठक झाली. (NCP leader Sharad Pawar meeting in Jalgaon on September 4 news)

जळगाव येथील मुक्ताई निवास्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची प्राथमिक बैठक झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांचा ४ सप्टेंबरला जळगाव जिल्ह्यात दौरा आहे.

या दौऱ्याच्या नियोजनाची चर्चा बैठकीत झाली. सागर पार्क येथे सभा घेण्याचे नियोजन आहे. नियोजनासाठी जळगाव जिल्हा व महानगर जळगाव यांची संयुक्त बैठक मंगळवारी (ता. २२) होणारी आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

sharad pawar
Sharad Pawar : शरद पवार एकेदिवशी मोदींचं नेतृत्व मान्य करतील; चंद्रशेखर बावनकुळेंना विश्वास

बैठकीला जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्रभय्या पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, महानगर जिल्हाध्यक्ष अशोक लाडवंजारी, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष वंदना चौधरी, महानगर महिला जिल्हाध्यक्षा मंगला पाटील, राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील, आदिवासी विभाग जिल्हाध्यक्ष इब्राहिम तडवी, समाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष अशोक सोनवणे, जामनेर तालुकाध्यक्ष विलास राजपूत, महानगर शहर संघटक राजू मोरे, महानगर जिल्हा उपाध्यक्ष किरण राजपूत, मार्केट कमिटी संचालक डॉ. अरुण पाटील, समाजिक न्याय उपाध्यक्ष रमेश बारे, संदीप हिवाळे, सौरभ औचाडे, शुभम म्हस्के, राहुल टोके आदी उपस्थित होते.

sharad pawar
Sharad Pawar: महाराष्ट्राचा सह्याद्री दिल्लीसमोर झुकत नाही; रोहित पवारांचा स्पष्ट संदेश

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.