Jalgaon News : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत शेतकरी विकास पॅनल व शिवसेना (शिंदे गट) यांच्यात सरळ लढत होती. यात राष्ट्रवादीचे शेतकरी विकास पॅनलने १८ पैकी १७ जागांवर विजय मिळवला. शिवसेना भाजप युतीला एकाच जागेवर समाधान मानावे लागले.
अखेर प्रतिष्ठेच्या लढतीत एकनाथ खडसे यांना १७ जागांवर यश मिळवले तर आमदार चंद्रकांत पाटील व अशोक कांडेलकर यांच्या पॅनलला अपयश आले. ग्रामपंचायत मतदारसंघात सेनेकडून फेरमोजणी अर्ज दिला. त्यात उलट राष्ट्रवादीच्या उमेदवाराचे एक मत वाढीव निघाले. (NCP won in Bodwad Bazar Committee Shetkari Vikas led by Khadse won 17 seats Jalgaon News)
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शेतकरी विकास पॅनलचे विजयी उमेदवार असे : विविध कार्यकारी सोसायटी मतदारसंघ : सुधीर तराळ ४९०, अंकुश चौधरी ४८६, राजेंद्र फिरके ४६२, ज्ञानेश्वर पाटील ४८८, आसाराम काजळे ४८६, किशोर भंगाळे ४६०, योगेश पाटील ४७७. या विविध कार्यकारी सोसायटी मतदारसंघात एकूण वैध मतपत्रिका ८०५ होत्या.
यात ७७ मतपत्रिका या अवैध ठरविण्यात आल्या. महिला राखीव मतदार संघ : आशाबाई टिकारे ४४६, जिजाबाई कांडेलकर ४६०, महिला राखीव मतदार संघात वैध मतपत्रिका ८४७ होत्या तर अवैध ३५ मतपत्रिका ठरविण्यात आल्या. इतर मागास वर्ग मतदारसंघ : ईश्वर रहाणे ५३४, इतर मागासवर्गीय मतदारसंघात वैध मतपत्रिका ८५२ होत्या तर अवैध मतपत्रिका ३० ठरविण्यात आल्या.
भटके विमुक्त जाती जमाती. विजय पाटील ५४१, भटके विमुक्त जाती जमाती मतदारसंघात वैध मतपत्रिका ८५२ होत्या तर अवैध मतपत्रिका ३० ठरविण्यात आल्या. ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदारसंघ. रामभाऊ पाटील ४६९, दत्ता पाटील ४८७,
हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदारसंघात वैध मतपत्रिका ९७१ होत्या तर अवैध मतपत्रिका ४३ ठरविण्यात आल्या. आर्थिक दुर्बल घटक : गणेश पाटील ४८७, आर्थिक दुर्बल घटकातील मतदारसंघात ९६१, वैध मतपत्रिका होत्या तर अवैध ५३ आल्या. व्यापारी मतदार संघ : माणकचंद अग्रवाल १४६, अनिल चौधरी ११२, व्यापारी मतदारसंघात वैध मतपत्रिका १८८ होत्या.
हमाल मापाडी मतदारसंघ : गोपाल माळी ५५, मतदारसंघात वैध मतपत्रिका १०३ तर अवैध मतपत्रिका १ ठरविण्यात आली. भाजप सेनेचे एकमेव विजयी उमेदवार, भाजप- शिवसेना युतीच्या शेतकरी परिवर्तन पॅनल ग्रामपंचायत मतदारसंघ : अनुसुचित जाती जमाती राखीव
जयपाल बोदडे ५०५ -भाजप. या वेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंगेशकुमार शहा यांनी तर सहाय्यक म्हणून एम. बी. गाडे बाजार समिती सचिव विशाल चौधरी, तुषार चिचोले यासह ४० कर्मचारी यांनी काम पाहिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.