Jalgaon News : भरपाई मिळत नसल्याने केळी विम्याकडे पाठ; मुदत फक्त 3 दिवस

banana crop
banana cropesakal
Updated on

Jalgaon News : गेल्या वर्षीच्या केळी पौकविम्याची भरपाई मिळण्याची मुदत संपून दीड महिना होत आला तरीही अजून भरपाई मिळत नसल्याने यावर्षी केळी पीकविम्याला केळी उत्पादक शेतकऱ्यांकडून नगण्य प्रतिसाद आहे.

पीकविमा काढण्यासाठीची मुदत फक्त ३ दिवस बाकी असताना २७ ऑक्टोबरला दुपारी चारपर्यंत जिल्ह्यातील फक्त जेमतेम १० हजार हेक्‍टर क्षेत्रावरील केळीचा विमा काढण्यात आला आहे.(Negligible response from banana farmers to banana crop insurance jalgaon news)

मागील वर्षीच्या म्हणजे २०२२-२३ या आर्थिक वर्षाची केळी पीकविम्याची भरपाई १५ सप्टेंबरनंतर जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना मिळणे अपेक्षित होते. यातल्या ४६ हजार हेक्‍टर क्षेत्राचा विमा हा कोणताही वाद नसलेला आहे. तर अन्य ३७ हजार हेक्‍टर क्षेत्राबद्दल विमा कंपनीने वाद उपस्थित केला आहे.

विमा कंपनीने कोणताही वाद नसलेल्या क्षेत्राच्या भरपाईचे पेसे तरी यापूर्वीच द्यायला हवे होते, असे केळी उत्पादक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र दिवाळी तोंडावर येऊनही हे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची कोणतीही चिन्हे नाहीत.

दरम्यान २०२३-२४ या आर्थिक वर्षातील केळी पीकविमा काढण्याची मुदत ३१ ऑक्टोबर आहे. मागील वर्षी सुमारे ८० हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्राचा विमा केळी उत्पादक शेतकऱ्यांनी काढला होता. मात्र यावर्षी विमा काढण्याची मुदत संपत आली आहे. फक्त ३ दिवस बाकी असतानाही १० हजार हेक्‍टर केळीचाही विमा निघालेला नाही.

'सकाळ'कडे प्राप्त आकडेवारीनुसार २२ ऑक्टोबरपर्यंत जिल्ह्यात ६ हजार २०८ केळी उत्पादक शेतकऱ्यांनी ९ हजार ५२७ हेक्टर्स क्षेत्रावरील केळीचा विमा काढला होता. मागील वर्षी ३ दिवस आधी सुमारे ३० हजार हेक्‍टसंपेक्षा जास्त क्षेत्राचा विमा काढला गेला होता.

banana crop
Jalgaon News : मूळगावी जाताना महिन्याच्या बाळाच्या रेल्वेतील मृत्यूने दाम्पत्याचा आक्रोश

मागील वर्षीच्या केळी पौकविम्याचे पैसे न मिळणे हे एक मुख्य कारणसांगितले जात आहे. तसेच जे शेतकरी अन्य शेतकऱ्यांना आपली शेती नफ्याने किंवा हिश्श्याने देतात, त्यांना हा करार रजिस्टर केल्यानंतरच केळी पीकविमा काढता येत आहे. तसे केल्याने शेतकऱ्याच्या सातबारा उताऱ्यावर शेती नफ्याने करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव लागत असल्याने शेतकरी अशी नोंदणी करणे टाळत आहेत.

यामुळेही पीकविमाकाढण्याचे प्रमाण हे दहा टक्क्यांपर्यंतखाली आल्याचे दिसून येत आहे. आज (ता. २८) ला किती केळी उत्पादक शेतकऱ्यांनी विमा काढला, या बाबत विमा कंपनी प्रतिनिधी राहुल पाटील यांना भ्रमणध्वनीवर विचारले असता त्यांनी आज आकडा सांगण्यास असमर्थता व्यक्‍त केली व सोमवारी आकडा सांगणार असल्याचे सांगितले. खासदार रक्षा खडसे यांनी केळी पीकविमा काढण्याचे आवाहन करूनही त्याला नगण्य प्रतिसाद मिळत आहे. आगामी तीन दिवसांत किती शेतकरी विमा काढतात, हे दिसून येईल.

''गेल्या वर्षीच्या केळी पीकविम्याची भरपाई मुदतीत मिळाली असती, तर जिल्ह्यात पुढील वर्षासाठी केळी पीकविमा काढणाऱ्या शेतकऱ्यांनी रांग लावून विमा काढला असता; मात्र या सरकारवर आता विश्‍वासच राहिलेला नसल्याने केळी पीकविमा काढणाऱ्यांची संख्या नगण्य झाली आहे."- गणेश महाजन, संचालक, बाजार समिती, रावेर

सत्ताधाऱ्यांचे मौन

मागील वर्षीच्या केळी पीकविम्याची भरपाई केव्हा मिळेल, याबाबत राज्य व केंद्रातील सत्ताधारी पक्षाचे प्रतिनिधी मौन बाळगून आहेत. जिल्ह्यातील ३मंत्री, ८ आमदार, २ खासदार सत्ताधारी पक्षाचे असताना देखील केळी उत्पादकांना पीक विम्याबाबत न्याय मिळत नसल्याने दिवाळीच्या ऐन तोंडावर संताप व्यक्‍त होत आहे.

banana crop
Jalgaon News : शेळगाव बॅरेजला मिळाली आणखी 12 हेक्टर जमीन; 100 टक्के पाणी साठणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.