Jalgaon News : आपण आतापर्यंत २२ बोटे किंवा २१ बोटे असलेली मुले जन्माला आल्याचे ऐकले असेल. परंतु न्हावी येथील ग्रामीण रुग्णालयात एका २० वर्षीय मातेने चक्क २६ बोटे असलेल्या एका बालकाला जन्म दिला आहे. ही महिला मध्य प्रदेशातील रहिवासी आहे.
या महिलेला प्रसूती वेदना होत असल्याने शनिवारी मध्यरात्री तीनच्या सुमारास रुग्णालयात आणले. या ठिकाणी डॉक्टर व संपूर्ण स्टाफने परिश्रम घेऊन तिची सुरक्षित प्रसूती केली. यात २६ बोटे असलेल्या या बालकास पाहून सर्वच अवाक् झाले. (New born baby has 26 fingers Crowd to see baby at Navi Rural Hospital Jalgaon News)
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
या नवजात बालकाला दोन्ही हाताला प्रत्येकी सहा सहा अशी बारा बोटे आहेत तर दोन्ही पायांच्या प्रत्येकी सात सात अशी १४ बोटे, अशी एकूण २६ बोटे आहेत. ज्योती नंदू नवाल बारेला (वय २०) असे या मातेचे नाव असून, ती झिरण्या (ता. जिरण्या, जि. खरगोन, मध्य प्रदेश) येथील रहिवासी आहे.
या महिलेची तपासणी वैद्यकीय अधिकारी डॉ. कौस्तुभ तळेले, अधिपरिचारिका कोमल आदिवाले, सुमित बोरसे, सरला परदेशी यांनी केल्यानंतर या गरोदर मातेची सुरक्षित प्रसूती केली.
दरम्यान, या मातीने ज्या बाळाला जन्म दिला त्याला एकूण २६ बोटे होती, हे पाहून सर्वच अवाक् झाले. सध्या माता व बालक या दोघांची प्रकृती ठणठणीत आहे तर या बालकाला पाहण्यासाठी अनेकांनी रुग्णालयात गर्दी देखील केली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.