Jalgaon News : चोपड्यात होणार राज्य उत्पादन शुल्कची नवी इमारत; साडेचार कोटींचा निधी मंजूर

Mumbai: While accepting the letter of approval for the proposed State Excise Inspectorate building at Chopra from Shambhu Raje Desai, MLA Lata and Prof. Chandrakant Sonavane. Neighbor Minister Dada Bhuse.
Mumbai: While accepting the letter of approval for the proposed State Excise Inspectorate building at Chopra from Shambhu Raje Desai, MLA Lata and Prof. Chandrakant Sonavane. Neighbor Minister Dada Bhuse.esakal
Updated on

Jalgaon News : चोपडा येथे राज्य उत्पादन शुल्कच्या नवीन प्रशासकीय इमारत, कर्मचारी निवासस्थान बांधकामास शासनाची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. त्यासाठी ४ कोटी ५८ लाख ९० हजारांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

चोपड्याच्या आमदार लता सोनवणे यांनी केलेल्या प्रयत्नांना याद्वारे यश आले असून, यासंदर्भात राज्य शासनातर्फे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अवर सचिव सं. गो. ढाकणे यांनी दिलेल्या आदेशाची प्रत नुकतीच प्राप्त झाल्याची माहिती माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी दिली.(New building of State Excise will be built in Chopda Administrative approval from government Fund of four and a half crores approved Jalgaon News)

चोपडा (जि. जळगाव) येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मालकीच्या सी.सी. नंबर २५४९, क्षेत्रफळ २७६९.२ चौरस मीटर जागेवर निरीक्षक कार्यालयाची नवीन प्रशासकीय इमारत, तसेच कर्मचारी निवासस्थान बांधकाम करण्यासाठी परवानगी मिळावी, यासंदर्भात प्रस्ताव पाठवून त्या अनुषंगाने आमदार लता सोनवणे यांचा पाठपुरावा सुरू होता.

राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई यांच्याकडून आमदार लता सोनवणे यांनी मंजुरी व आदेशाची प्रत स्वीकारली. राज्याचे बंदरे व खनिकर्म मंत्री दादा भुसे, माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे या वेळी उपस्थित होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी

Mumbai: While accepting the letter of approval for the proposed State Excise Inspectorate building at Chopra from Shambhu Raje Desai, MLA Lata and Prof. Chandrakant Sonavane. Neighbor Minister Dada Bhuse.
Jalgaon News : तरण तलावातील तरुणाच्या मृत्यूची चौकशी होणार; जिल्‍हाधिकारी अमन मित्तल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.