Jalgaon BJP News : भाजप शहराध्यक्षपदी कुणाची लागणार वर्णी? उत्सुकता शिगेला

 BJP
BJPesakal
Updated on

Jalgaon BJP News : भारतीय जनता पक्षाच्या शहराध्यक्षपदी कोणाची वर्णी लागते, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागून आहे.

पुढील वर्षी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या, तसेच लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजपच्या कोणत्या कार्यकर्त्याला आमदार मंगेश चव्हाण संधी देतात याबाबत उत्सुकता शिगेला पोहचली आहे. (new city president of bjp jalgaon news)

माजी नगरसेवक नितीन पाटील व सरचिटणीस अमोल नानकर हे दोघे या पदासाठी इच्छुक आहेत. पक्षाशी असलेली एकनिष्ठा, पक्षासाठी तळमळीने काम करणाऱ्या कार्यकर्त्याची निवड असे निकष लावून पक्षाने आजपावेतो शहराध्यक्षपदाची निवड केलेली आहे. पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकांमध्ये शहराध्यक्षपदाची भूमिका महत्वपूर्ण ठरणार आहे.

त्यामुळे पक्षाच्या दोन्ही कार्यकर्त्यांची नावे जरी स्पर्धेत असली, तरी आमदार चव्हाण यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. माजी नगरसेवक पाटील हे गेल्या १० वर्षांपासून भाजपमध्ये सक्रिय आहेत. १० वर्षांपूर्वी ते शिवसेनेचे सुरवातीपासून कट्टर शिवसैनिक होते. त्यांनी शिवसेनेत अनेक महत्वपूर्ण पदे भूषविली आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

 BJP
Jalgaon BJP News : भाजयुमो प्रदेश उपाध्यक्षापदी भैरवी वाघ-पलांडे यांची नियुक्ती

त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तेंव्हा सर्वांनाच धक्का बसला होता. त्यांना भाजपमध्ये घेण्यासाठी खासदार उन्मेष पाटील यांनी महत्वपूर्ण भूमिका निभावली होती. त्यानंतर त्यांची स्वीकृत नगरसेवकपदी वर्णी लागली होती. माजी केंद्रीय मंत्री अण्णासाहेब एम. के. पाटील यांचे ते खास समर्थक आहेत.

दरम्यान, आमदार चव्हाण यांच्यापुढे अल्पसंख्यांक समाजाच्या कार्यकर्त्याला की मराठा समाजाच्या कार्यकर्त्याला शहराध्यक्ष पदाची संधी द्यायची, हा मोठा पेच निर्माण झाला आहे. शहराध्यक्ष घृष्णेश्‍वर पाटील यांची चाळीसगाव तालुका विधानसभा क्षेत्र प्रमुखपदी निवड झाल्यामुळे, शहराध्यक्ष निवडीच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.

 BJP
BJP Vs INDIA Group News : जिल्ह्यात भाजपविरोधात ‘इंडिया’ एकजूट! जिल्हा पातळीवर ‘इंडिया गटा’ची प्रथमच बैठक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.