New Education Policy : शैक्षणिक वर्ष २०२४ -२५ पासून पदवीस्तरावर सर्व महाविद्यालयांमध्ये नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या विविध विद्याशाखांच्या अभ्यासक्रमांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यापरिषदेने सोमवारी (ता.३०) मान्यता दिली. कुलगुरू प्रा.व्ही.एल. माहेश्वरी विद्या परिषदेच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते.
विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा आणि मानव्य विज्ञान विद्याशाखा या तीन विद्याशाखांमधील विविध विषयांच्या अभ्यासमंडळांनी सर्व विषयांचे नवीन अभ्यासक्रम तयार केले आहेत. (new educational policy will be implemented from next year in nm university jalgaon news)
पुढील शैक्षणिक वर्षापासून पदवीस्तरावर नवीन शैक्षणिक धोरण लागू केले जाणार असून त्यासाठी विद्यापीठाची तयारी पूर्ण झाली आहे. त्याचा एक भाग म्हणून विद्यापरिषदेच्या बैठकीत या सर्व नवीन अभ्यासक्रमांचे विषय मान्यतेसाठी ठेवण्यात आले होते. या सर्व अभ्यासक्रमांना विद्यापरिषदेने मान्यता दिली.
तसेच नवीन शैक्षणिक धोरण पदवीस्तरावर राबविण्यासाठी इतरांच्या तुलनेत आघाडी घेतल्याबद्दल सर्व अभ्यासमंडळांच्या सदस्यांचे आभार व्यक्त केले. बैठकीत नव्या बदलांना आपण सामोरे जाणार असून नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणी बाबत पालक, विद्यार्थी आणि प्राध्यापकांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी लागणार आहे. त्यासाठी विद्यापीठाकडून कार्यशाळा घेतल्या जातील, असे कुलगुरूंनी सांगितले.
कॉपीमुक्त अभियान प्रभावी
विद्यापीठाच्या पदवी परीक्षा नुकत्याच सुरू झाल्या असून कॉपीमुक्त अभियान तसेच तणावमुक्त अभियान याचा मोठा परिणाम जाणवत आहे. हॉल तिकिटावर विद्यापीठाने कॉपी केल्यास कोणती शिक्षा होऊ शकते हा मजकूर प्रसिद्ध केल्यामुळे या परीक्षांमध्ये कॉपी करण्याचे प्रमाण दिसत नाही, अशी भावना परिषदेच्या सदस्यांनी व्यक्त करून कुलगुरू आणि विद्यापीठ प्रशासनाचे आभार मानले. कुलगुरूंनी परीक्षांच्या मूल्यमापन कामात प्राध्यापकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी केले.
बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. चर्चेमध्ये प्र-कुलगुरू प्रा. एस.टी. इंगळे, अधिष्ठाता प्रा. अनिल डोंगरे, प्राचार्य डॉ. एस.एस. राजपूत, प्राचार्य डॉ. अशोक खैरनार, प्राचार्य डॉ. शशिकांत बऱ्हाटे, प्राचार्य डॉ. विजय बहिरम, प्राचार्य डॉ. मिलिंद बिल्दीकर, प्राचार्य डॉ. डी.ए. सूर्यवंशी, प्राचार्य डॉ. अरविंद चौधरी, प्राचार्य डॉ. बी.वाय. रेड्डी, प्राचार्य डॉ. मनोहर पाटील, प्राचार्य डॉ. गौरी राणे, डॉ. नारखेडे, प्रा. महेंद्र रघुवंशी, प्रा. नितेश चौधरी, प्रा. योगेश पाटील, प्रा. भुपेंद्र केसुर, प्रा. प्रशांत देशमुख, प्रा. जितेंद्र तलवारे, डॉ. सुधीर भटकर, नवनियुक्त सदस्य राजाराम कुलकर्णी तसेच प्रा. चित्ररेखा काबरे यांनी भाग घेतला. कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.