Jalgaon News : शहरात नवीन औद्योगीक वसाहत उभारण्यासाठी कुसुंबा परिसरात जागेचे सर्वेक्षण करण्यात आले. मुंबई येथील उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जागेची पाहणी केली. दोन आठवड्यात अंतिम सर्व्हेक्षण करून शिक्कामोर्तब करण्यात येणार आहे.
जळगाव शहरात एमआयडीसी आहे. मात्र, त्या ठिकाणी नवीन उद्योग येण्यासाठी जागा नाही. त्यामुळे नवीन मोठे उद्योग येण्यासाठी अडचण येत होती. (New industrial estate in Jalgaon Survey of 308 hectares of land in Kusumba area Final survey in two weeks Jalgaon News)
ही अडचण लक्षात घेऊन नवीन औद्योगीक वसाहत उभारणीची मागणी होत होती. नवीन औद्योगीक वसाहत उभी राहिल्यास नवीन उद्योग येतील. त्यामुळे तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहे. त्यासाठी शासन स्तरावरही पाठपुरावा सुरू होता.
आमदार भोळेंचा पाठपुरावा
जळगावचे आमदार सुरेश भोळे यांचा जळगावला नवीन औद्योगीक वसाहत व्हावी, यासाठी पाठपुरावा सुरू होता. त्यासाठी त्यांनी पाहणी करून जागाही सुचविल्या होत्या, तसेच विधिमंडळातही अनेकवेळा प्रश्न उपस्थित केला होता. त्या वेळी मंत्र्यांनी हिरवा कंदीलही दिला होता.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
कुसुंबा परिसरात ३०८ हेक्टर जागा
नवीन औद्योगीक वसाहतीसाठी कुसुंबा परिसरात तब्बल ३०८ हेक्टर जागा सुचविली होती. शासनाकडे जागेचा प्रस्तावही पाठविला होता.
गुरुवारी (ता. १५) दुपारी या जागेची पाहणी मुंबई येथील एमआयडीसी विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी वैशाली मुळे, जळगाव एमआयडीसीचे अधिकारी अनिल गावित यांनी पाहणी केली.
विमानतळाने चांगली सुविधा
जळगावचे विमानतळ कुसुंबा गावालगतच आहे. त्याच परिसरात नवीन औद्योगीक वसाहतीसाठी जागेचे सर्वेक्षण झाले आहे. विमानतळाचा नवीन औद्योगीक वसाहतीसाठी मोठा फायदा होणार असल्याचेही सांगण्यात आले.
प्राथमिक सर्वेक्षण
शासनातर्फे जळगावच्या नवीन औद्यौगीक वसाहतीसाठी जागेचे प्राथमिक सर्वेक्षण झाल्याचे सांगण्यात आले.
दोन आठवड्यांनी पुन्हा सर्वेक्षण करून त्याचा अंतिम अहवाल पाठविला जाणार आहे. त्यानंतर शासनाकडून त्यावर शिक्कामोर्तब होईल. मात्र, नवीन औद्योगीक वसाहत उभी राहण्यास आता चालना मिळाली आहे.
"जळगावात नवीन औद्योगीक वसाहतीसाठी गुरुवारी कुसुंबा परिसरातील जागेचे प्राथमिक सर्वेक्षण करण्यात आले. दोन आठवड्यांनी पुन्हा अंतिम सर्वेक्षण करण्यात येईल."
-अनिल गावित, अधिकारी, औद्योगीक वसाहत, जळगाव
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.