New Sand Policy : ठेकेदारांनी पाठ फिरविल्याने नवे वाळू धोरण संकटात

New Sand Policy
New Sand Policyesakal
Updated on

Jalgaon News : राज्यातील नव्या वाळू धोरणांतर्गत डेपोची निर्मिती करण्यासाठी ११ मेपर्यंत ठेकेदार निश्चित करून १५ मेपासून नागरिकांना वाळू उपलब्ध करून द्यायची होती.

मात्र, जिल्हाधिकारी कार्यालयाने सहा वाळू डेपोंसाठी राबविलेल्या टेंडर प्रक्रियेला प्रतिसाद मिळाला नसल्याचे दिसून आले. यामुळे टेंडरची प्रक्रिया जिल्हा प्रशासनाला पुन्हा नव्याने करावी लागणार आहे. (New sand policy in crisis as No response received from contractors jalgaon news)

जिल्ह्यात सहा गटांपैकी केवळ तीन वाळू गटांसाठी अर्ज आले होते. त्यातील दोन अर्ज अपात्र होते. धावडे, अमळनेर, रावेरसाठी कोणीही टेंडर भरलेले नाही. यामुळे टेंडरसाठी कोणीही इच्छुक नसल्याचे समोर आले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रस्तावित केलेल्या वाळूघाटांना ठेकेदारांकडूनही प्रतिसाद मिळत नसल्यामुळे सरकारच्या स्वस्त वाळू धोरणाचे काय, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

नवीन धोरणानुसार राज्य सरकारने सर्वसामान्य नागरिकांना ६०० रुपये ब्रास या दराने वाळू देण्याचा, तसेच घरकुल योजनांच्या लाभार्थ्यांना मोफत वाळू देण्याचा निर्णय घेतला आहे. यात लाभार्थ्यांना केवळ वाहतूक खर्च करावा लागणार आहे.

यामुळे नवीन वाळू धोरणाचे राज्यात स्वागत होत आहे. या धोरणाची १ मेपासून अंबलजबावणी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यासाठी कमी वेळ मिळाल्यामुळे महसूल विभागाने सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांना १० मेपर्यंत वाळू ठेक्यांची टेंडर प्रक्रिया राबविण्याचे निर्देश देऊन १५ मेपासून नागरिकांना स्वस्त दरात वाळू उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

New Sand Policy
Girish Mahajan : "शेतकऱ्यांची अडवणूक केली तर बँकांवर गुन्हे नोंद करा" गिरीश महाजन कडाडले

जळगाव जिल्ह्यात ८ वाळू घाटांना परवानग्या देण्यात आल्या. त्यात केऱ्हाळे बुद्रुक (ता. रावेर), पातोंडी (ता. रावेर), दोधे (ता. रावेर), धावडे (ता. अमळनेर), बाभुळगाव-१ व बाभुळगाव-२ (ता. धरणगाव), तांदळी (ता. अमळनेर), भोकर (ता. जळगाव) यांचा समावेश आहे. त्यातील दोन वाळू गट शासकीय कामासाठी राखीव ठेवले आहेत. सहा वाळू गटांसाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली.

जाचक अटी

निविदेत वाळू गटांवरून १० जून ते ३० सप्टेंबर या पावसाळ्याच्या कालावधीत वाळू उपसा करता येणार नाही, अशा अटी ठेवली आहे. यामुळे या टेंडर प्रक्रियेकडे ठेकेदारांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाला पुन्हा नव्याने टेंडर प्रक्रिया राबवावी लागणार आहे.

पावसाळ्यानंतरच शक्यता

टेंडर प्रक्रिया पूर्ण न होऊ शकल्यामुळे वाळू डेपो १५ मेपर्यंत सुरू करण्याचे वेळापत्रक पाळले जाणार नसल्याचे दिसत आहे. वाळू गटांवरून १० जूनपर्यंतच वाळू उपसा करता येणार आहे. त्यामुळे टेंडर प्रक्रियेस उशीर झाल्यास त्याचा परिणाम नागरिकांना वाळू मिळण्यावर होणार आहे. यामुळे मोठा गाजावाजा करून सुरू केलेली ही योजना खऱ्या अर्थाने पावसाळ्यानंतरच प्रत्यक्षात येण्याची शक्यता अधिक असल्याचे बोलले जात आहे.

New Sand Policy
Jalgaon GMC : जिल्हा रुग्णालयात उष्माघात कक्ष नावालाच; असा कक्षच नसल्याची कर्मचाऱ्यांची माहिती!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.