जळगाव : तरसोद ते चिखली दरम्यान नव्याने तयार केलेल्या महामार्गावर (Highway) काही दिवसांपासून तडे (Cracks) पडले आहेत. अचानक पडलेल्या तड्यानी वाहनांची चाके पंक्चर होण्याचे प्रकार वाढले आहे. महामार्गावर सुसाट वेगाने वाहने धावतात. महामार्गावरील तड्याच्या ठिकाणी गाडी येताच चालकांचे वाहनावरील नियंत्रण सुटते. तो कशीबशी गाडी नियंत्रित करतो. मात्र तड्याच्या ठिकाणी असलेल्या अणकुचीदार खडीमुळे वाहनाची चाके पंक्चर होताहेत. यावरून महामार्गाचे काम कशा दर्जाचे झाले असेल, याची कल्पना येते. (Newly constructed highway bad condition Jalgaon News)
तरसोद ते चिखली दरम्यान महामार्गावर अनेक ठिकाणी तडे पडल्याची उदाहरणे आहेत. हे तडे लवकर दिसून येत नाही. वाहने वेगाने जाताना अचानक तड्यावरून गाडी जाताच एकतर वेग अतिशय कमी करावा लागतो. त्यात गाडीची चाके जागीच घासली जातात. सोबतच तड्यांच्या ठिकाणी असलेल्या अणकुचीदार खडी वाहनांच्या चाकात रुतते त्यात चाके पंक्चर होतात. सुमारे दररोज पाच हजारांवर वाहने महामार्गावरून जातात. त्यातील अनेकांना रस्त्यावरील तड्यांचा फटका बसला आहे.
तक्रार करण्याची सोय नाही
महामार्गावरील समस्यांबाबत तक्रार करायची असल्यास महामार्ग प्राधिकरणाने सोय केलेली नाही. फेब्रुवारी महिन्यात नशिराबादजवळ टोल नाका सुरू केला तेथे टोल वसुली करण्यास कंत्राटदार आहे. तो महामार्गाच्या समस्यांबाबत तक्रार घेत नाही. नागरिकांनी महामार्गाच्या समस्यांबाबत तक्रारी तरी कोठे करावी, असा प्रश्न सर्व सामान्य वाहनधारकांना पडला आहे.
कामे अपूर्ण तरी टोल वसुली
तरसोद ते चिखली दरम्यान अनेक ठिकाणी कामे अपूर्ण आहेत. नशिराबादजवळ रेल्वे उड्डाणपुलाच्या एका बाजूने पूर्णत: काम अपूर्ण आहे. एकाच बाजूने अपडाऊनची वाहने ये-जा करतात. रात्री या ठिकाणी पथदिवे नाही. परिणामी अपघात होण्याची दाट शक्यता आहे. भुसावळ रेल्वे उड्डाणपुलाचेही एका बाजूचे काम अपूर्ण आहे. येथे पथदिव्यांचे पोल उभारले आहेत. त्यातील दोनच पथदिवे सुरू आहेत. इतर पथदिवे बंद आहेत. रात्री येथे अंधार असतो. भुसावळ शहरात जाणारी, महामार्गावरील इतर वाहनांची रात्री येथे कोंडी होते.
"साकेगाव बायपासजवळ खडी पसरल्याने गावात येताना दुचाकीस्वारांची वाहने घसरतात. महामार्गाचे अधिकाऱ्यांना सांगूनही ते दखल घेत नाही. बायपासजवळ पथदिवे नसल्याने रात्री अंधारात अपघाताचा धोका आहे." - जितेंद्र पाटील, वाहनधारक
"मी दररोज जळगाव ते भुसावळ चारचाकीने प्रवास करतो. टोलची दररोज आकारणी होते. महामार्गावर अनेक ठिकाणी तडे पडले आहेत. त्यामुळे वाहने पंक्चर होऊन, अपघाताचा धोका वाढला आहे. महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष घालावे. अन्यथा टोल वसुली थांबवावी."
- विजय चौधरी, वाहनधारक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.